पान:मराठ्यांच्या इतिहासाची साधनें.pdf/288

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

१६३ कड कोणी येक आला नाही. सेवकाने मागती श्रीमंतास आर्जदास्त लिहिली की गडबड फार आहे. काही जमाव आणिखी देविला पाहिजे. त्यावरून कुल आटोळे व गाढवे यांस पत्रे आली की जालनापुरी गडबड आहे तों तेथें तैनात राहणे. ऐसी पत्रे आली, परंतु कोणी येक आला नाही. घरोघर माणसें तों बैसली आहेत. आलियावर लिहून पाठवू. वरकड निजामअल्लीकडील वर्तमान वरच्यावर लिहिणे ऐसी आज्ञा. त्यास वराड प्रांत परगणेपरगणेयांतील साहुकार व जमीदार यांजपासून जबरदस्तीने पैका काही हाती लागला तो घेत आले. बाळापुरी कोणी तुळसाजीपंत आहे, त्याण कांहीं मामलतीवर कर्ज दिल्हें. ऐसे मिळोन पांच सालाख रुपये पावेतों बाळापुरीं जमा कांहीं जाले. कांहीं येणें तें घेऊन आपण घाट चढावे तो आपली खासी स्वारी गंगातीरी आली. मग घाट चढणे कठीण होईल या दहशतीने विठोजीपंत दिवाण मागे पैक्यासाठी ठेऊन आपण घाट चढले; ते अंबडापुरावर आठ मुक्काम केले. तेथून अलीकडे पांच कोस उतरापीपेठ अंबडापुरची आहे तेथे येऊन चार दिवस जाले. शेत कापून चारितात व घरें कुल अंबडापुर परगणेयाची जाली. पाऊस दीड मास या प्रांतें नाहीं. त्यामुळे काडी गवताची नाही व खरीफ वाळते गेले. ते जागीर त्या परगणेयाचे असोन लुटितात. शहरास ताबडतोब यावें त्यास पुण्याहून पत्रामागे पत्रे श्रीमंताची येतात की तुह्मी शहरास हरगीज न येणे. हा येक सबब. दुसरें निजामअल्ली बराखुद मीच नवाब ऐसें जाणोन वराड प्रांतें व वरघाटें जागिरा लोकांच्या दूर करून नव्यास देऊ लागले. ईभरायमखान गाडदियासी जाफराबाद किल्ला कबिले ठेवावयासी द्यावयाची तजवीज जागीर सुद्धां परगणा द्यावा हे नवाब सलाबतजंगानें ऐकिले. त्यावरून निजामअल्लीस लिहिले की तुह्मास वराड प्रांत दिल्हा आहे तेथील कारभार करणे. वावगी वर्तणूक न करणे. त्यावरून चित्तांत संकोचित होते. मध्ये शहानवाजखानाचा सलूख जाला ऐसें बसालतजंगाने लिहिले होते त्याजवरून थोबले राहिले व तलबगाडदी फिरंगी याची तलब चढली ते दोन लाख