पान:मराठ्यांच्या इतिहासाची साधनें.pdf/287

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

[८५] पे॥ छ ११ मोहरम. ॥ श्री ॥ २६ सप्टेंबर १७५७ राजश्री बाबूरावजी दाम मोहबतह येत जाद दोस्ता बादज दुवा आ की जे कांहीं तुह्मी रायजगनाथ यांसी बोललेत सविस्तर त्याचे लिहिल्यावरून विदित जाहले. त्यासी जो कांहीं करार श्रीमंत रावसाहेब करमफर्मा रावपंतप्रधान यांचे समक्ष तुमचे विद्यमाने भवानीशंकरांहीं केला असेल तो आमांस प्रमाण असे व तुह्मांस ठाऊक आहे व पंत मरेचा जाबसाल तुमचेच विद्यमाने असे. आता पुन्हा उत्तर प्रतिउत्तर उचित नाही. भवानीशंकरांही लिहिले होते की रावसाहेब मेहरबान र॥ विश्वास नाथास पाठवणे की शहर जवळ असे, वकीलास ताकीद करतील. श्रीमंतजीपासून आज्ञा रायमजकुरची पाठवायाची घेतली असे. त्यास तुमचे लिहिल्यावरून त्यास पाठविले असे की । विश्वासरावजी सेवेसी व तुह्मापाशी हजर असेत. आणखी उत्तर प्रतिउत्तर त्याशी नाही. जे कांहीं भवानीशंकरांही करार केला आहे तो प्रमाण असे. तुझी प्रारंभापासून सर्व गोष्टींस जाणत असा. आतां लिहिणे प्रयोजन नाही. जे काही सर्व स्नेहाचे असे तें करणे. कामाचे मुख्य तुझीच असा. ज्यादा काय लिहिणे. हे किताबत. [८६] ॥श्री॥ २३ सप्टेंबर १७५७. पे॥ छ ११ मोहरम प्रहर दिवस चढता सोमवार. श्रीमत् राजश्री रावसाहेब स्वामीचे सेवेसीः-- आज्ञाधारक गणेश संभाजी सा॥ नमस्कार विज्ञापना. त॥ छ ८ मोहरम पावेतों सेवकाचे व प्र॥ म॥रचें वर्तमान यथास्थित असे. स्वामीनें आज्ञापत्र पाठविलें तेथें आज्ञा जे आटोळे वगैरे पथक ताकीद करून पाठवणे. त्यावरून त्याचे घरोघर जासूद ढलायेत प॥ आहेत. परंतु अद्यापि कोणी एक राऊत आला नाही. येक हणमंतराउ आटोळे मात्र हाजीर आहेत. वर