पान:मराठ्यांच्या इतिहासाची साधनें.pdf/286

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

निजामअल्ली याजला कुराण देऊन येईल आणि दगा करील तरी न कळे. जालें तरी नफा आणखी होईल. खुलासा हकीमजीस घेऊन सेवेसी पोहचलों जाणावें. सर्व मजकूर रूबरू अर्म करीन. सेवेसी श्रुत होय. हे विज्ञापना. [८४] ॥ श्री ॥ २६ सप्टेंबर १७५७. पे॥ छ ११ मोहरम सोमवार अवशीची चार घटका रात्र. श्रीमंत राजश्री विश्वासराव स्वामीचे सेवेसी: --- विनंति सेवक कृष्णाजी रघुनाथ सा॥ नमस्कार विनंति उपरि येथील कुशल त॥ आधिक शुद्ध १३ म॥ शहर जाणून स्वामींनी निजानंदलेखन आज्ञा करीत असिले पाहिजे. विशेष. येथील वर्तमान तो राजश्री जीवनराव व हकीम महमदअल्लीखा आज सेवेसी येणार. निजामअल्लीचें वर्तमान तो जाफराबादेहून कुच करून काल गिर्नानदीवर आले. तेथून कुच करून दाभाडी अलीकडे येणार. येका दो दिवसांत शहरास दाखल होतील. निजामअल्लीच्या तर्फेनें येक भला मनुष्य येथे सलाबतजंगाजवळ आला होता. कितीकश्या स्वच्छतेच्या गोष्टी सांगितल्या. त्याजवरून यांनी जवाहिरमल मुनसी त्यासमागमें देऊन आज रवाना केले. निजामअल्लीचा मतलब की येथे येऊन यासी भेटावें व चार दिवस राहावें. मग आपल्या तालुकियास जावें. निजामअल्लीसमागमें चार हजार पांच हजार पावेतों स्वार आहेत. लक्ष्मणराव खंडागळे व गिरनोजी आटोळे हे दोघे मराठे समागमें आहेत. ईभराईमखा गाडदी त्यासमागमें आहे. त्याजपाशी दोन अडीच हजार गाडदी व पंचवीस जर्ब तोफा त्यासमागमें आहेत व सरकारच्या दाहा तोफा इतका सरंजाम त्यासमागमें आहे. कळावें. बहुत काय लिहिणे. कृपालोभ असो दीजे. हे विनंति. HEALUTI २१