पान:मराठ्यांच्या इतिहासाची साधनें.pdf/285

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

[८३] श्रीदत्तात्रय. २६ सप्टेंबर १७५७, पे॥ छ ११ मोहरम सोमवार दीड प्रहर दिवस सायंकालचा. अर्ज विज्ञापना ऐसीजे. येथील क्षेम ता॥ छ ११ मोहरम सोमवार चार घटका दिवस प्रथम मुकाम शहर सेवकाचे वर्तमान यथास्थित असे. विशेष. प्रार्थना ऐशीजे आज्ञापत्र छ १० रविवार चार घटका रात्रचे पाठविलें तें येच समयीं पावले. सत्वर हुजूर हकीमम।।अल्लीखा यास घेऊन येणे. तुझ्या येण्यास फार गुणक ? जातात ह्मणोन विस्तारें आज्ञा. ऐसीयास आज हकीमजीस बाहेर डेन्यादाखल करवितों. उदईक सहित खानमारनिले सेवेसी येतो. निजामअल्ली जाफराबादेच्या पलीकडे साता कोसांवर आहे. त्याचे भले माणुस दोधे येथे आले. जबाबसाल तेहि भले माणुस सहीत याचे सुफीबेगखा व जवाहरमल व ब्रीजनाथ हे तिघेजण जातात. नवाब बाहेर निघतात. जसवंताच्या तलावावर शहरच्या पूर्वेस राहतील. श्रीमंत प्रतापवरिष्ठाभिधान राजश्री पंतप्रधानसाहेबाचें आज्ञापत्र या सेवकास सादर जालें तेंहि पावलें. शहानवाजखानाकडे भला माणूस पाठविला. जवाबसाल ठीक करितो. परवाने जागीरीचे शहानवाजखानाचे तयार होतील ते स्वामीपाशी येतील. परभारे येक काडीचे काम त्याजला ईतला दिल्हें नाहीं व पुढे ईतला देणार नाही. नजरहि माकुल माझे मुदे माफीक ठीक करितो. परवाने जागीर स्वामीपासी परगणे नेमस्त होतील. परवानेहि आह्मीच आपल्यापाशी झणजे सरकारांत ठेऊन घेऊ. निजामअल्लीकडील राजकारणे लाऊन ठेविलींच आहेत. राजश्री आपाजी धोंडाजी यास जाहेर उगेच ब॥ घेतलें. बातन निजामअल्लीचे राजकारण लाविलें यास्तव आपाजीपंतास ब॥ घेऊन येतों जाल्या कराराप्रमाणे हकीमजीस घेऊन येतो. आज सोमवारी मुकाम पेडापरावरच जाला. उत्तम. उदईक मुकामाविसी आज्ञापत्र सादर करावें. येथन विनंतिपत्र अर्ज होईल त्याप्रमाणे करावयास स्वामी समर्थ. नवाब बसालतजंग जीवंत आहे तर जालें राजकारण कारभार तिळभर यांत तफावत नाही.