पान:मराठ्यांच्या इतिहासाची साधनें.pdf/284

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

१५९ कदाचित् बसालतजंग मेला अगर कोण्ही दगा करून धरला तरी राजकारणास आठचार दिवस विलंब लागेल. वरकड गुता नाही. निजामअल्लीत यात पेच पाडलाच आहे. सर्व मतलब सख्तहि करून घेतले. माहाल नेमावे आणि परवाने करावे. अहद पैमान व्हावे तें सर्व स्वामीपासी आल्यावर अर्ज करितों. यापूर्वी दोन तीन आज्ञापत्रे सादर जाली त्यांत खुलासा जे बाणशेंदरे प्रांत कनड व कासारबारी या डोंगरांत चारा आहे व पाणी उत्तम मनसुबे फार पोटांत याच गोष्टीचा आहे ते त्याजवरून नवाबसाहेबास या सेवकाने सांगितले की निजामअल्ली जाफराबादेपलीकडे त्याच डोंगरांत दाभाडी वगैरे येथे चारा आहे. श्रीमंत सद्गुणस्वभाव राजश्री रावसाहेबाकडेच मुतवजें होणार व मुकामातहि करणार, यास्तव नवाबसाहेबी बहुत स्नेहाने लिहिले की इकडे न जावें. बाणशेंदरेयाचे रोखें जावें तेथें मुकामात करावें. हकीमम।।अल्लीखा व जीवनराव यास सोमवारी र॥ करितों ह्मणोन नवाबांनी लिहिले आहे तो खलिता बजिनस पाठविला. पावेल. जवाब उत्तम गोड पाठवावा. बाणशेंदरेकडेच जातो हाणोन ल्याहावं. उदईक सोगवारी हकीमजी डेरे दाखल होतील. मंगळवारी दोनप्रहरा येथून चालतील. बुधवारी सेवेसी येतो. मजला विलंब नाही. परंतु मोगलाई कारभार सुस्त फार असे. खुलासा हकीमजीस घेऊन सेवेसी पोहचलोंच यांत संशय नाही. बाणशेंदरें प्रांत कनड येथे मुकामात करावें. शहरापासून चवदा कोसांवर असावें. दौलताबादेपासून आठ नव कोस पलीकडे असावें. डोंगरचारा आहे तेथे जावयास मार्गी लहान लहान कुच चव चव कोसाचे करावे. इतकियांत निजामअल्लीची खबर कळेल. नवाबहि नाहेर निघतील. दो ती दिवसांनी जसवंताच्या तलावावर राहतील. रूख निजामअल्लोकडील तरी बसालतजंग जीवंत आहे तरी याच्या बोलल्या गोष्टींत तिळभर अंतर नाही. सेवेसी श्रुत होय. हे विज्ञापना.