पान:मराठ्यांच्या इतिहासाची साधनें.pdf/283

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

१५८.. दोघे रुखसत जाले. तेहि उदईक जातील. हकीमजीस व या सेवकास हुजूर यावयास विलंब नाही. परंतु निजामअल्लीचें निस्तुक जाले पाहिजे. नवाब सलाबतजंगांनी लेहून बसालतजंगास पत्रे आणविलीं ऐसें नसावें. श्रीमंतासच थोरले नवाबाचे फार अगत्य यास्तव लिहिलें ऐसें असावें. सेवेसी श्रुत होय. हे विज्ञापना. [८२] श्रीदत्तात्रय. २६ सप्टेंबर १७५७. पे॥ छ ११ मोहरम सोमवार प्रातःकाळ सूर्योदय. अर्ज विज्ञापना ऐसीजे. येथील क्षेम ता॥ छ १० मोहरम रविवार दीड प्रहर रात्र मुकाम शहर सेवकाचे वर्तमान यथास्थित असे विशेष. प्रार्थना ऐसीजे. आज्ञापत्र सादर जालें तेथें आज्ञा की खासा स्वारी गंगातीरप्रांतें येऊन बारा दिवस जाले. जीवनराव येऊन कामकाज विल्हे लावीत नाहीत. तेव्हां काय प्रकार आहे हे काही कळत नाही. हे सुधे नाही ह्मणोन लोक चर्चा करितात. पाहातां बारा दिवस येऊन जाले. तुमचे येणे होत नाही. तेव्हां संशयास जागा होते, यास्तव तुझी उदईक येथे येऊन सर्व काम विल्हेस लावणे. अतःपर निजामअल्लीच्या येण्या न येणियाची वाट न पाहाणे. तुह्मीं पेच पाडून ठेविलाच आहे. तुझा बंधु यास तेथे ठेऊन हकीमम॥अल्लीखास घेऊन हुजूर येणे. तुझ्या येण्याने सलुख खराखुरा जाला हा लौकिक होऊन, कामें विल्हेस लागून, दुसरेकडे मुतवजे होणे कामें मंजूर आहेत ह्मणोन विस्तारें आज्ञा. ऐसीयास येथे चिरंजीव अवधूत राव केशव यास ठेऊन सेवक व हकीमम॥अल्लीखा सोमवारी छ १: मोहरमी येथून स्वार होतो. दोही दिवसांनी पायावर डोकी ठेऊन में आपल्यास सनाथ करून घेतो. जाली मामिलियेत यांत पीळपेच नाही