पान:मराठ्यांच्या इतिहासाची साधनें.pdf/282

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

१५७ विद्यमाने निजामअल्लीचे राजकारण आले की श्रीमंत माझी दस्तगीरी करतील तर चित्तानरूप सलूख करीन. फिरंग्यास एकंदर येऊ देणार नाही. भोसले यासी जैसें सांगाल तैसें करीन. त्याजला उत्तर दिल्हें जे हा मजकूर हुजूर लिहितों; हुजूरून पुण्याचा जाब यावयास दाहा दिवस लागतील; तोंवर तुह्मी पुढे येऊं नये; याल तर सरकारची फौज धाऊन येऊन गळां पडेल; काम तुमचे सर्व नासेल; यास्तव जवाब येईल तोंवर उगेंच राहाणे. राहातील. दरमियानच्या दिवसांत हकीमजीस घेऊन येतो.गुंता उरकून घेऊ. निजामअल्लीने पन्नासाच्या जागीरी दिधल्या तर कार्याच्या नाहीत. बदमामली असे. परंतु फिरंग्यास एकंदर येऊ देणार नाहीं, स॥ इभराइमखा गारदी फिरंग्यांचा दुषमन त्याजब॥ आहे. बसालतजंग प्रामाणिक यासच स्थापावें आणि सरकारचे काम करावें. हणमंतराव निंबाळकर व महाराव जानोजी या सेवकानें आपले सूत्री लाऊन घेतलें. जालें राजकारण यांत पीळपेच नाही. निजामअल्ली न यावा इतकाच मात्र तरतूद. व में राजकारण आलें तें खावंदास ल्याहावे. कदाचित् निजामअल्ली भावास जाहेर सलूख दाखऊन आला आणि दगा केला तर हेहि सूत्र असावे, यास्तव लाऊन ठेविलें असे. शहानवाजखानाकडे पैगाम केला आहे. त्याणे माझे मुदे माफीक काम केले तरी बरेंच आहे. लक्षप्रकारे करावेसें आहे. कदाचित् उचित रीतीने पैका कबूल न केला तरी किल्ला नवाबास घ्यावयाची परवानगी द्यावी. आणखी जागीर नवाबाकरी सरकारांत देवितों हाहि मजकूर उगाच लिहिला असे. खातरेत असावें. नवाबसाहेब थोरले नवाब सलाबतजंग यांणी एकांतीं हकीमजीचें विद्यमाने दोन मसविदे, येक बसालतजंगास पत्र, ऐसे हुजरचे पुण्याहून आणवावे व त्याच पत्रांत जवाब श्रीमंत स्वामीस बसालतजंगांनी ल्याहावा ह्मणोन मसविदा आहे तोहि घालावा. तरी हे विनंतिपत्रासहित मसविदे दोन्ही पारसी बजिनस हुजूर पाठवावे. त्याप्रमाणे पत्रे तेथील आणवावी. निजामअल्लीचे तर्फेने दोघे भले माणूस मुसलमान नवाबापासीं जबाबसालास ॥ जाले. उदईक येतील. येथूनहि