पान:मराठ्यांच्या इतिहासाची साधनें.pdf/280

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

दिवस गुजरून जातील. इतक्यांत फिरंगी समीप येऊन पावले तरी त्याच्याहिं यणेयाचा एखादा बहाना काढितील जे त्याच्या सलाहाने करावे लागले. असें करितां लांबण फार पडेल. फिरंगियांनी इसाकपटणींहून छ १० जिल्हेजी डेरे बाहीर केले होते. छ १४ जिल्हेजी दिढा कोसांचे कुच इकडे यावयाकरितां केले होते. त्यास तेथून निघोन पंचवीस दिवस जाले. पाहवें कोठवर आले असतील ? निजामअल्ली चाळीस पंचेचाळीस कोसांवर आणि आपली फौज गंगातीरी पंधरा कोसांवर. ऐसें असतां आपले काम त्याचे येणेयाचे संशयाकरितां बंद ठेवणे सलाह माझे बुद्धीस तरी येत नाही. इकडे आपले काम माहाल वगैरे निवडन द्यावयास शुरू केलिया अधिक निजामअल्लीवर दबाव पडेल की आतां कांहीं बाकी राहिली नाही व याचा ग्रहस्त येऊन गंतल्यावर आणखी कारभार काय करणार ? माहाला तपसील करून देतीलच ह्मणजे जागा जागा कमावीसदार पाठवावेच. सहजच गुता उरकेल. व लोकांचे तर्कवितर्क दूर होतील. नाहीतर संशय दूर होत नाहींत. मी आपल्या बहीने लिहिले असे. वरकड करणार में समयोचित असेल तेंच करीत असतील. परंतु फिरंगी समीप येऊन पावले तरी हैदरजंगास स्वामी पुरते जाणतात जे कसे काव्यादाव्याचा मनुष्य आहे. दिसता प्रकार सविस्तर विनंति लिहिली. पुढे समयोचित सलाह असेल ते करणार स्वामी समर्थ असेत. हे विनंति. रवाना छ १ माहे मोहरम. [८१] श्रीदत्तात्रय. २५ सप्टेंबर १७५७. पे॥ छ १० मोहरम रविवार साघटका दिवस प्रातःकाळचा. अर्ज विज्ञापना ऐसीजे येथील क्षेम ता।। छ ९ मोहरम मंदवार तीन चार घटिका रात्र मुकाम शहर सेवकाचें वर्तमान यथास्थित असे. विशेष.