पान:मराठ्यांच्या इतिहासाची साधनें.pdf/279

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

१५४ आलाच तरी कलह वाढेल, हेहि खराबीच. याजकरितां काल बसालतजंगांनी आपला दिवाण जव्हायरमल्ल व पेशकार बिरजनाथ हे दोघेजण त्यास समजाऊन माघारे वाटे लावावयास पाठविले. ते व कांहीं मेवा वगैरेहि पाठविला. जाहिरी तरी कृत्रिम कांहीं भासत नाहींच. स्वामीचाच स्नेह संपादून रहावें ऐसा भाव दिसतो. तीर्थस्वरूप ॥ जीवनराव यांनी सर्वप्रकारें आपली खातरजमा करून घेतली आहे. खोजे रहमदुलाखान व हकीम महमदअल्लीखान हे मध्यस्त. यांचे वचन प्रमाण घेतले आहे. स्वामींनी मजला लिहिला मजकूर तीर्थस्वरूप जीवनराव यासीहि लिहिला होता. त्यांचे पत्र मी पाहिले व हेहि पत्र त्यांस दाखविले व त्याचेच खातरजमेवरून भरंवसाहि पुरता. कृत्रिम कोठे आढळत नाही. तो आला तरी लढाईस सिद्ध होऊं ऐसें हे ह्मणतात. इतका अकृत्रिम प्रकार दाखवून जरी चित्तांत कृत्रिम भाव असला तरी दो चौ दिवसांत कळेल. जरी निजामअल्ली येऊंच लागला आणि हे लढाईस बाहिर न निषेत तरी परिच्छिन्न कृत्रिमसे कळेल. परंतु कृत्रिम विचार करावयाची हिंमत सहसा होणार नाही. जालीच तरी श्रीकृपेनें याचे पारपत्य करणे कांहीं कठीण नाही. परंतु त्याचे येणें या न येणे याकरितां सरकारचे काम बंद ठेवावें हें सलाह नाही. त्याच्या येणें या न येणेंयाचा जसजसा प्रकार घडेल तसा घडो. तशासारखी फिकीर त्याची श्रीकृपेने होईल. परंतु जो करार व मदार ठहरला आहे त्याचे महाल वगैरे घ्यावयाजकरितां श्रीमंत साहेबजादे याजपाशी मोगलाकडील हकीम महमदअल्लीखानास नेऊन अशाच संधींत दबून दबकाऊन चित्तानरूप काम माहाला करून घ्यावें हेंच सलाह आहे. जरी अशा संधींत मोगलाकडील गृहस्थ नवे आणा वाहिल्या, हवाल्यावर टाकीत, तरी आपण सावध व्हावें. स्वामी ज्यास हाती धरतील त्यास नमूदांत आणितील हे सर्वांस कळले आहे. अशा संधींत चित्तानरूप माहाल द्यावयाची वेळ आहे. जरी निजामअल्लीचा लडा वारल्यावर काम करून घेऊ घाटल्यास विलंबावर पडत पंधरा वीस दिवस गुजरून गेले. आणखीहि इतकेच