पान:मराठ्यांच्या इतिहासाची साधनें.pdf/27

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

गुजराथेंतील मोहीम, १७५४ तील कंभरीचा वेढा व १७५५ तील दिल्ली, रोहिलखंड ह्या प्रदेशांतील मोहिमा, पँटडफ्ला मुळीच सोडून द्याव्या लागल्या. कुंभेरीचें नांव त्याने एका ठिकाणी काढिले आहे; परंतु, तें भीतभीतच काढिले आहे व त्या पॅरिग्राफावर टीप देतांना रघुनाथरावाच्या हिंदुस्थानांतील मोहिमांसंबंधी आपल्याला चांगली माहिती मिळाली नाही ह्मणून प्रांजलपणे कबूल केले आहे. परंतु, ह्या प्रांजलपणांत थोडासा हटवादीपणा हि दाखविला आहे. अमदावाद १७५३ त घेतली किंवा १७५५ त घतली ह्याचा टिपेंत निर्णय करतांना १७५५ हैं साल त्याने पसंत केलें आहे. ह्या निर्णयामुळे रघुनाथरावाच्या हालचालींचा खरा नकाशा त्याला काढितां आला नाही. तो कसा काढिता आला नाही ते पुढील दोन चार वाक्यांत स्पष्ट करून दाखवितो. ग्रॅन्टङपच्या मताप्रमाणे रघुनाथरावाने १७५५ च्या एप्रिलांत अमदाबाद घेतली. नंतर तो अमदाबादेहून निघाला असल्यास हिंदुस्थानांत जाण्यास थालनेरच्याच मार्गाने आला पाहिजे. थालनेरास येण्यास रघुनाथरावाला जून महिना अवश्य झालाच असला पाहिजे व सबंध पावसाळा थालनेरास रहाणे त्याला भाग पडले असले पाहिजे. नंतर १७५५ च्या सप्टंवरांत तो हिंदुस्थानांत गेला असला पाहिजे व नंतर कुंभेरीचा वेढा व रोहिलखंडाची स्वारी त्याने केली असली पाहिजे. ह्या इतक्या सर्व खटाटोपी करून, ग्रँडफ् ह्मणतो, तो १७५६ सालच्या अगोदर झणजे १७५५ च्या डिसेंबरांत देशी पुण्यास आला. परंतु, हे सर्व पँटडफ्चे तर्क झाले. कारण, रघुनाथराव १७५६ च्या आगष्टांत पुण्यास आले; हें सप्रमाण सिद्ध करण्यांत येते. ह्याला पुरावा काव्येतिहाससंग्रहांतल्या पत्रे व यादी वगैरेंतील ४५१ वें पत्र आहे. तेथें अंताजी माणकेश्वर लिहितो की, दादासाहेबांच्या स्वारीने नरवरच्या घाटाने येऊन आपल्या सैन्याची झडती घेतली. १७५५ च्या मार्च-एप्रिलांत वाळाजी बाजीराव नाशिक ऊफ गुलचनाबाद येथे असतांना अंताजी माणकेश्वर त्यांना ससैन्य भेटला. तेथे त्यांना बाळाजी बाजीरावाने हिंदुस्थानांत जाण्यास सांगितले. हिंदुस्थानांत जातांना वाटेंत दादासाहेबांची स्वारी नरवरच्या घाटाने परत येतांना त्याला भेटली. ह्यावरून रघुनाथराव १७५५ च्या डिसेंबरांत पुण्यास आले ह्मणून ग्रँट्डफ ह्मणतो तें खोटे असून रघुनाथराव जुलै- आगष्टांत पुण्यास आले हे निःसंशय खरे आहे हे सिद्ध आहे. १७५५ त बाळाजी बाजीरावाने व महादाजीपंत पुरधन्याने वेदनूरची स्वारी केली. बाळाजी कृष्णेपर्यंत जाऊन मध्येच नाशकाला सिंहस्थाकरितां जाण्यास परतले, ते सलाबतजंगाच्या राज्यांतून कायगांवटोक्यावरून ( पत्रे व यादी १६ ) नाशकास गेले. कायगांवटोक्यावरून बाळाजीला जाण्यास एक कारण झाले, ते हे की, सलावतजंगानें जानोजी भोसले व रघोजी करांड यांच्यावर स्वारी करण्याचा घाट घातला होता तो इकडून शह देऊन जागच्या जागीच वसवून टाकावा. ह्या (१२) डावपेंचाचे वर्णन ह्या पुस्तकांतील लेखांक ६५ त केले आहे. हे राजकारण पँट्डफ्ला माहीत नव्हते. नाशकाहून बाळाजी बाजीराव पुण्यास १७५५ च्या एप्रिल-मेंत आले व १७५५ च्या नोव्हेंबरांत सावनूरच्या स्वारीस