पान:मराठ्यांच्या इतिहासाची साधनें.pdf/278

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

व सरकारच्या यांच्या मिळोन पन्नास. याखेरीज बाण वगैरे सरंजाम चांगला आहे ह्मणून नवाबाचे येथें वर्तमान आले. व शामजी गोविंद टकले यांचे पत्र मजला आले. त्यांत वर्तमान त्यांनी लिहिले आहे. तें पत्र बजिनस हजूर पाठविले आहे. त्यावरून सविस्तर अर्थ ध्यानास येईल. भोसले यांची फौज तर त्याजब॥ नाही ह्मणून वर्तमान आहे. मी येथून भोसले याचे वकिलाकडून वरचेवर लिहिवीत गेलो. मजला कळला तसा प्रकार येथील भासवीत गेलो. त्याजवरून बाबूराव कानेरे यांचे पत्र मजला आले ते यापूर्वी बजिनस हजूर पाठविलेंच आहे. पाहून अर्थ ध्यानास आलाच असेल. व र॥ येशवंतराव कानेर हे निजामअल्ली समीप होते. त्यासहि वरचेवर लिहित गेलो. त्याचेंहि उत्तर र॥ रघुनाथपंत वकील यांसी आले त्याची नकल घेऊन यापूर्वी जोडी रवाना हजूर जाली त्या पत्राच॥च रवाना करीत होतो. परंतु ते नकल चुकून राहून गेली ते सांप्रत पाठविली आहे. त्याजवरून अर्थ कळों येईल. अस्सल पत्र र॥ यशवंतराव याचे तीर्थस्वरूप र॥ जीवनराव केशव यांनी रघुनाथपंतापासून घेतले होते तें त्यांनी हजूर पाठविले असेल. निजामअल्लीने न यावे हा प्रकार केलाच आहे. व अलीकडे नवाबाची पत्रे त्यांस पाठविली आहेत की तुवा सहसा न यावें. त्यास पत्रे पावली त्या संधींत त्याने अंबडापुराहून कुच करून, धोव्यासमीप पेनगंगा आहे तेथवर तीन कोस येऊन राहिला. मुकाम आहेत. मोठ्या संशयांत पडला जे भावाकडे जावें तर तेथील प्रकार विशकलीत दिसतो; माघारें परतून जावें तर वराडांत कोणी पुसणार नाहीं; जे भावाने पिटून लाविलें अशा संकटांत पडून आहे. परंतु लोकांत ह्मणतात जे राजश्री विठ्ठल सुंदर दिवाण बालापुरास कांहीं कर्जवाम मेळवावयास गेला आहे, त्याची मार्गप्रतीक्षा करितात. तो आला ह्मणजे पुढे अवरंगाबादेस जाऊं असें ह्मणोन कालक्रमणा करितो. व नानाप्रकारचे विचार आचार इभ्राइमखान वगैरे करीतच आहेत. त्याचा याचा पेच पडला. परंतु यासहि संशय आहे जे इभ्राइमखान वगैरे सामान त्याजपाशी चांगले आहे. जरी रेटून