पान:मराठ्यांच्या इतिहासाची साधनें.pdf/277

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

१५२ मचे आज्ञापत्र सादर जालें तें छ ९ माहे मजकुरी पावलें. मस्तकी वंदिले. तुवां पत्र पाठविलें तें पावले, त्याचे उत्तर सरकारची यापूर्वी जोडी आली होती ती येथेच राहिली होती, तीजबराबर सविस्तर वर्तमान लिहून पाठविलें असे. त्याप्र॥ वरचेवर वर्तमान लिहीत जाणे. नवाबाजवळ नवी फौज किती ? मनसबदार कोण कोण ? किती फौजेनें जमा जाहलें ? निजामअल्ली कोठे आहेत ? त्याजपाशी गाडदी व तोफखाना काय ? फौज काय ? जानोजी भोसले याची फौज कोण ? किती आहे ? तें सर्व लिहिणे. भोसल्यांचे वकिलाकडून लेहून करवावयाचा प्रकार पेशजी लिहिला होता त्याचे काय कसें केलें ? तें सर्व लिहिणे करणे. निजामअल्लीचाहि प्रकार पेशजीच्या लिहिल्याप्रे॥ करावयाचें करणे. वरचेवर वर्तमान लिहित जाणे. पंचवीस लाखांची जागीर सरकारांत द्यावी, नगर द्यावें. शाहानवाजखानास तीन लाखांची जागीर व दौलताबाद व अंतूर दोन्ही किल्ले करार करावे, इतके मजकूर कबूल केले ह्मणोन जीवनराव यांणी लिहिले. त्यावरून चिरंजीवास व दत्तबास सलुख करावयाविशी लिहिले आहे. सत्वर पंचविसांचे परगणे मात्र चांगले निवडून घ्यावें, भेटावें, सलुख जाहीर करावा ऐसें लिहिले आहे. परंतु फौजा जमा करितात. निजामअल्ली येणार. इभ्राई मखान जुंजाच्या गप्पा मारतात. त्यास तुर्त सलुख लाऊन ठेवावा. फौजा जमा जालीयावर कजीयास उभे राहावें ऐसा भाव आहे. किंवा शुद्ध भाव आहे हा शोध घेऊन लिहून पाठवीत जाणे ह्मणोन आज्ञा. ऐशास येथील वर्तमान हुजूर वरचेवर विनंति करीत असतोच. सांप्रत येथे फौज नवाबाची मुगली, कदीम व नवी व किरकोळ मनसबदार मिळोन पांच हजार व हणमंतराव निंबाळकर दोन हजार व जानोजी निंबाळकर हजार व मुधोजी नाईक निंबाळकर व नागोजी माने व बाजीराव घोरपडे वगैरे किरकोळ मन्हाठे पांचशे येकूण साडेआठ हजार फौज येथे आहे. वरकड कोणी अधिक आगळी लिहितील तर लिहोत. परंतु इतकीच मौज आहे. निजामअल्लीहि पांचहजार फौज, नवे तीन हजार गाडदी व तोफा गाडद्यांच्या