पान:मराठ्यांच्या इतिहासाची साधनें.pdf/276

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

लाख दोन लाखाची वाट करून देविली. राजश्री मुधोजी भोसले याजकडे मलकापूर, आकोट, आमोद वगैरे सोळा महाल सरंजामाचे आहेत. त्या माहालावरी तफरीक तीस हजार आली. त्याची निशा कमावीसदारापासून करून घेतली प॥. अंबडापुर येथील जमीदारांकडे पेशकश व नजर बारा हजार रुपये करार केले. पांचसा मुकाम पर्जन्याकरितां अंबडापुरी मुकाम जाले. याउपर कुच दरकुच शहरास येत आहेत. बाळापुरानजीक होते. तेथे श्रीमंताची पत्रे आली की उतावळी करून तुह्मी शहरास यावेसें नाहीं. आलियास तुमचे आमचे स्नेहास अंतर पडेल. त्यास नवाबांनी उत्तर पाठविलें की या दिवसांत जावयाचे आपणासहि जरूर नव्हते. परंतु नवाबाची पत्रे वरचेवर येतात की सीताब येणे, त्यावरून खावंदाचा हुकूम बजाऊन आणावा जरूर, यास्तव येत असो; परंतु आह्मी शहरास पावलियावर श्रीमंताचे स्नेहाची वृद्धि अधिकोत्तर होय तेच करून. ह्मणऊन उत्तरें गेली आहेत. विदित होय. लक्ष्मण खंडागळे व रामचंद्र जाधवराव यांसहि याची पत्रे गेली होती. त्यास खंडागळे जाफराबादेचे मुकामास येऊन भेटणार. त्याजब॥ हजार स्वार आहेत. रामचंद्र जाधवहि गंगेवर आले ह्मणोन वर्तमान आहे. याउपरि होईल तें वृत्त वरचेवर सेवेसी लिहिले जाईल. सेवकापासी जासूद बहुत नाही. दोन तीन जोड्या आहेत. त्या वरचेवर पुण्यास रवाना कराव्या लागतात. यास्तव दोन चार जोड्या सेवकाकडे पाठवणार स्वामी खावंद आहेत. सेवेसी विदित होय. हे विज्ञप्ति. [८०] ॥ श्रीशंकर ॥ २५ सप्टेंबर १७५७. पे॥ छ १० मोहरम रविवार सा घटका दिवस प्रातःकाळ. श्रीमंत सद्गुणमूर्ती साहेबाचे सेवेसीःआज्ञाधारक कृष्णाजी त्रिंबक सा॥ नमस्कार उपरि विनंति. छ २ मोहर