पान:मराठ्यांच्या इतिहासाची साधनें.pdf/275

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

१५० पत्र पुण्यास रवाना करणे उचित असले तरी रवाना करणार स्वामी समर्थ असेत. हे विनंति. ॥ श्री ॥ २३ सप्टेंबर १७५७. पे॥ छ ८ मोहरम शुक्रवार दोन प्रहर दिवस. श्रीमंत राजश्री रावसाहेब स्वामीचे सेवेसीःविनंति सेवक शामजी गोविंद सा॥ नमस्कार विनंति येथील कुशल ता॥ छ ४ मोहरम मुफाम उतरादीपेठ प॥ अंबडापुर प्रतीतातीर दर लष्कर नवाब निजामुदौला स्वामीचे कृपादृष्टीने यथास्थित असे. यानंतर आज्ञापत्र छ २२ जिल्हेजचे जासुदासमागमें सादर जालें तें मुकाम मजकुरी कालीं पावलें. पत्री आज्ञा की नवाब कोठवर आले, कोणे मुद्यावर येतात, ते बातमी वरचेवर लिहित जाणे. ऐसीयास अलजपुरी नवाब असतां नवाब सलाबतजंग व बसालतजंग यांणी लिहिले की शहानवाजखान बागी होऊन दौलताबाद बळाऊन बसला आहे. त्याचे पारपत्य करावे लागते. तर रात्रीचा दिवस करून फौजसमेत येऊन पोहचणे. त्यावरून तीन चार हजार फौज व तोफखाना समागमें होता तो व इभरामखान गाडदी यास हजार स्वार, तीन हजार गाडदी व बारा तोफानसी, पंच्यायशी हजार रुपये दरमाहा निखालस द्यावे या करारानें, चाकर ठेऊन अलजपुरीहून कुच करून मुलकापासून अललहीसाहा ? थोडाबहुत वसूल घेऊन खर्ची करीत करीत येथवर आले. राजश्री जानोजी भोसले सेनासाहेबसुभा यांणीं आपणाकडील कमावीसदारांस लिहिले की नवाब मुलकापासून थोडाबहुत वसूल घेऊन शहरास जातील. त्यास तुह्मी जमीदारांस ताकीद करून देविणे, अडथळा न करणे. त्यावरून कमावीसदारांनी जमीदारांस रुजू करून