पान:मराठ्यांच्या इतिहासाची साधनें.pdf/274

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

१४९ [७८], श्रीभवानीप्रसन्न. २२ सप्टेंबर १७५७. ॥ छ ७ मोहरम गुरुवार तृतीय प्रहर. श्रीमंत सद्गुणनिधान साहेबाचे सेवेसी: आज्ञाधारक कृष्णाजी त्रिंबक साष्टांग नमस्कार उपरी विनंति, आजी गुरुवारी छ ७ मोहरमी येथे कांहीं कवतुक जालें तें विनंति करितों. काल नवाब सलाबतजंग राजश्री जानोजी निंबाळकर यांचे घरास रंभापुन्यास संध्याकाळी येकबयेक विसापंचविसा माणसानसी गेले होते. मागून वाद्य .व सवारीचा सरंजाम जाऊन पावला. तिकडून येतां बसरंजाम आले. इतकें काल जालें होतें. आज प्रातःकाळीच गजराचे वेळेस स्वारी तयार करविली जे बेगमचे मुकब-यास जातो. त्याजवरून कितेकांनी त्याच वेळेस येऊन बसालतजंगास सांगितले जे शहानवाजखानाकडे दौलताबादेस रातोरात श्रीमंताची फौज येऊन त्यास घेऊन श्रीमंतापासी टोक्यास गेले व नवाबांनीहि स्वारी तयार करविली. नवाबहि तिकडेच जाणार. काल जानोजीसी हेच मसलहत केली होती. त्याचे बलें नवाब निघून जाणार. ऐसें बसालतजंगास सांगतांच बसालतजंग स्वार होऊन नवाबाचे घरास गेले व शहरचे दरवाजे बंद करविले. ऐसी हुल्लड येक प्रहर दिवसापरियंत जाली. शेवटी शाबीत जालें जे सर्व लटके. नवाब बेगमचे मुकबन्यास जाणार. तव्हां बसालतजंग उठोन आपले घरास आले. जालें वर्तमान विदित व्हावें ह्मणोन विनंति लिहिली असे. हे विनंति. फिरंग्यांकडील वर्तमान आले जे छ १० जिल्हेजी ईसाकपटणीहून डेरे बाहेर केले होते जे इकडे यावें. तदनंतर छ १४ माहे मजकुरी तेथून दिढा कोसाचे कुच केले. पुढे कुचदरकुच इकडे येणार. इतकें वर्तमान आले. विदित होय. हे विनंति. हे वर्तमान श्रीमंतसगुणमूर्ति साहेबांस लिहिले नाही. हेच विनंति