पान:मराठ्यांच्या इतिहासाची साधनें.pdf/273

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

१४८ । ७७ ॥ श्रीदत्तात्रय. ॥ १८ सप्टेंबर १७५७. पे॥ छ ३ मोहरम अवशीची सवा ग्रहर रात्र. अर्ज विज्ञापना ऐसीजे. येथील क्षेम ता॥ छ ३ मोहरम रविवार दोन प्रहर मुकाम शहर सेवकाचें वर्तमान यथास्थित असे. विशेष. प्रार्थना ऐसीजे. दौलताबादेचे मोर्चे कुल उठले. कुल सरदार सैदअकबरखान, मेटीअल्लीखा व मुरादखा व नसीरजंग वगैरे कुल आपल्या घरास आले. याउपरि दौलताबादेंत गल्ला वगैरे जे चित्तास येईल तिकडून जावा न्यावा. कोणी मुजाहीम नाही. याउपरि आज अगर उद्यां अगर परवां निजामअल्लीचा गुंता उरकून सेवेसी खान अलीशान हकीमम॥अलीखा यास घेऊन येतो. सर्व फैसला करार जाल्याप्रमाणे अमलात येईल. निजामअलीसी यासी पेच मोठे हिंकमतीने पाडला. आतां पस्तावले. परंतु मोठे काम हे खावंदास कळावें. मी येथे रिकामा बसलों नाही. सरकार कामावर बसलों. हुजूर पत्र पावतांच न आलों ह्मणोन रागास न यावें. जानोजी भोसले यासी व निजाम अल्लीसी पेच मोठे पढ़नेरे पाडला. श्रुत असावें. महाराव जानोजी केवळ निखालस सर्व प्रकारें दौलतखा स्वामीचा आहे. आयंत गोष्टींत तिळभर पिळपेंच न देखिला. नित्य एका दिवसा आड भेट होत असती. जिकडे स्वामीची मर्जी तिकडे माहराव जसवंत निंबाळकर ; यांत अंतर नाही. हकीमम॥अलीखास घेऊन येतो. किल्याचे मोर्चे उठले. आतां तरी मोगलाच्या करारमदाराचा इतबार असावे. ज्या राजकारणांत पीळपेंच असेल त्या कामांत मी येणार नाही. मी कांहीं मातबर नाहीं, गरीब असे. माझे विनंतींना इतबार असावा. हे विनंति. हेच पत्र हुजूर पुण्यास जावें. खोजे रहमदुलाखाबहादर व हकीमम।।अलीखा याचा रुका आला तो बजिनस पाठविला, पावेल. | युक्तीने.