पान:मराठ्यांच्या इतिहासाची साधनें.pdf/272

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

नंतर हकीमजीस घेऊन हुजूर येतो. माझा गुंता नाही. परंतु निजामअल्ली फिरवून वराडांत जाये उपाय आरंभला आहे, तो एका दिवसानी निदानी दोदिवसांनी सिद्धीस जाये ऐसें आहे. यास्तव आजचा उद्याचा दिवस राहिलों. रुसखत तरी याजपासून जालोंच आहे. पूर्वी विनंति लिहिलीच आहे. निजामअल्लीच्या लष्करांतून आपाजी धोंडाजी यांस पत्रे आली ती व रघुनाथपंत मुनसी, वकील जानोजी भोसले याचा, यास यशवंतराव कोनेर याचे पत्र आलें तें व रामचंद्र कोनेर झणजे बाबूराव कोनेर याचे पत्र अप्पाजीपंतास आलें तें बजिनस सेवेसी पाठविली. वाचून सहित हे विनंतीपत्र हुजर पुण्यास रवाना करावयाविसी आज्ञा करावी. महाराव जानोजी निंबाळकर याचे पत्र श्रीमंत स्वामीस आहे तेंहि पुण्यास रवाना करावयास आज्ञा. महाराव जानोजी निंबाळकर यांणी राजश्री रावफडणीस यास पत्र लिहिले. तेंहि पाठविलें असे. निजामअल्लीकडील जवाब संध्याकाळ पावेतों नवाब साहेबांस येईल. तदनंतर जे तदबीर होईल ते विनंति केली जाईल. सेवेसी श्रुत होय. हे विज्ञापना. माझें पत्र परभारें हुजूर पुण्यास जात नाहीं यास्तव में लिहिणे स्वामी ल्याहावयास समर्थ. चित्तास आल्यास माझें विनंति पत्र बजिनस इरसाल करावे. हे विज्ञापना. _मी येथे सुखें बसलों नाही. सरकारच्या मातबर कामासाठी राहिलों. याहि उपरि आज्ञाच अशी असली तरी सोमवारी स्वार होऊन येतो. हकीमजीचे लोक फौज, तईनाती, गारदी, बंदी वगैरे बाहर निघाल्यास येक दिवस लागेल. मोगलाई कारभार! अमासुस्त. डेरा मात्र हकीमम॥अलीखाजीचा शहराबाहेर रंभापुरियाजवळ दिल्हा असे. हे विज्ञापना... या पत्राब॥ लोकांची पत्रे आली ती प॥ असेत. १ अप्पाजी पंतास रामचंद्र कोनेर याचें. १ रघुनाथपंत मुनसी यास येशवंतराव १ जानोजी निंबाळकर याचें। कोनर याचें. सरकारांत आलें तें. १ बाबूराव फडणीस यास जानोजी ३ कित्ता कागद निंबाळकर याचें आलें तें