पान:मराठ्यांच्या इतिहासाची साधनें.pdf/270

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

१४५ आह्मांपाशी फौज सासात हजार जमा झाली. आणखीहि वरचेवर येत आहे. सेवेसी श्रुत होय.हे विज्ञप्ति.पै॥ छ २६ जिल्हेज, रविवार प्रहर दिवस, सायंकाळ. [७५] श्रीदत्तात्रय. १६ सप्टेंबर १७५७. पै॥ छ १ मोहरम शुक्रवार संध्याकाळ. श्रीमंतसद्गुणस्वभाव राजश्री रावसाहेबाचे सेवेसी: आज्ञाधारक जीवनराव केशव साष्टांग नमस्कार विनंति. येथील क्षेम ता॥ छ १ मोहरम शुक्रवार प्रातःकाळ सूर्यउदये यथास्थित असे. विशेष. प्रार्थना ऐसीजे:-निजामअल्ली शहरापासून तीसा कोसांवर जाफराबादेस आला. तदनंतर बसालतजंगाचा व निजामअल्लीचा पेच मातबर पाडला. येथून थोरले नवाब सलाबतजंग याचे पत्र व बसालतजंगाचे पत्र निजामअल्लीस पाठविलें कीं येकंदर पुढे न येणे, वराडांत जाणे. भेटीचा मजकूर तरी आह्मी थोडक्या दिवसांत येऊ. भेट होईल ऐसें पत्र गेलें. निजामअल्ली येकंदर पुढे येणार नाहीत. आले तरी यास मुस्तेद करून लडावीन. निजामअल्ली मारला जाईल. महाराव आले ते भयाकरितां उगेच आहेत व मजलाहि वळखतात. गोड गोष्टी बोलतात. दौलताबादेचे मोर्चे आज शुक्रवारी संध्याकाळ पावेतों उठवून रविवारी हाकीमम।।अल्लीखा यास घेऊन स्वामीपाशी येतो. गंगेअलीकडे काही फौज राजश्री शिंदे सुभेदार याची आली ह्मणऊन मोगलास कळलें तरी येक राऊत गंगेअलीकडे न यावा. मजला लटकेपणा येईलसें न करावें. मोगलाच्या करारमदारांत तिळभर अंतर नाही. मोठी गोष्ट निजामअल्लीस न येणे ह्मणोन पत्रं गेली. आला तरी पारपत्य याजकरीच करवीन. शहानवाजखान दौलताबादेच्या किल्यांत बसला होता. त्याच्या भोंवतीं सलाबतजंगाच्या लोकांनी वेढा घालून मोर्चे दिले होते. ते सलाबतजंगाला उठवावयाला सांगावें ह्मणून पेशव्यांनी जीवनरावास हुकूम केला होता.