पान:मराठ्यांच्या इतिहासाची साधनें.pdf/269

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

१४४ की मोगलाचा व आपला सलूख झाल्यादाखलच आहे; शहानवाजखान यास जाहागीर द्यावयाची रदबदल मात्र राहिली आहे. तेहि थोडक्या गोष्टीसाठी तोडितात असा अर्थ नाही. गंगातीरास जाऊन जीवनरायास बोलावू पाठवणे, म्हणोन आज्ञा होती. त्यावरून नेवासें नजीक मुक्काम करून स्वामीची मार्गप्रतीक्षा करीत असो. चार पांच रोज मुक्काम मजकुरी झाले. स्वामीचें येणे किती का रोजांनी होईल ते आज्ञा करावी. शहरीहून बातमीचें वर्तमान आले आहे की निजामअल्ली एका दो रोजांनी शहरास दाखल होणार. जानबा निंबाळकर कुच करून गेले. हणमंतराव निंबाळकर याकडील शाहाजी सुपेकर व फिरंगोजी पवार याजबरोबरी फौज देऊन शहरास रवाना केले. दिवसेंदिवस भारी होत आहेत.गंगा उतरून जावें तरी वकील शब्द ठेवितील की सलूख बिघडला. न जावें तरी ते बळावत * चालले. याच्याविशी आज्ञा काय ते लिहन पाठवावी. त्याप्रमाणे वर्तणूक केली जाईल. आपला चुलता जो कान्होजी भोसले त्याजवरोबर स्वारी शिकारीस जात असे (ना. भा. वः पृ. २९ ). असले हवे तितके दाखले आणीक कितीतरी देता येतील. सारांश सांगण्याचा महा काय की त्यावेळी मराठेशाहीत लढायांचा, दरवारांचा व एकंदर संसाराचा अनुभव मनुष्याला फार लवकर येऊन मोठा उत्कटहि येई. सध्यां बारातेरा वर्षांच्या सुमारास पोर इंग्रजी अक्षरें शिकण्यास लागतात. त्याकाली प्रांत काबीज करण्यास व संसार चालविण्यास वारातेरावर्षाच्या उमरीचा पुरुष योग्य समजत असत. एकंदर आयुष्यक्रम त्यावेळों भरीव असून सध्यांच्या सारखा पोकळ नव्हता. संसाराची जवाबदारी व जगाचा अनुभव बालवयांतच कळू लागल्यामुळे त्यावेळचे लोक अल्पवयांत मरूनहि प्रस्तुत कालच्या लोकांपेक्षा जास्त दिवस जगत व सहस्रपटीने जास्त महत्वाची कामें करीत असेंच कबूल करणे निर्विवाद आहे. १६८ औरंगाबादेहून.

  • नानासाहेबपेशवे, शहानवाजखान व जीवनराव ह्या तिघांनी सलाबतजंगाला धरून कैदेत घालण्याची मसलत रचली होती. तेव्हां ऐनवेळेच्या अगोदर पेशव्यांच्या सरदारांनी गंगा उतरून दौलताबादेवर चालून जाऊन सर्व रंग बिघडवून टाकू नये ह्मणन मोंगलाचा व आपला सलूख होत आहे, तेव्हां तुह्मी गंगा उतरून येऊ नका, असे पत्र पाठवणे पेशव्यांस भाग पडले