पान:मराठ्यांच्या इतिहासाची साधनें.pdf/26

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

खटपटीसंबंधी अँडफ्च्या ग्रंथांत एक अक्षरही सांपडण्यासारिखें नाहीं. हैं जयाप्पाच्या व रघुनाथरावाच्या मोहिमांविषयीं झालें.. १७५२च्या डिसेंबरांत भालकीची लढाई व तह झाल्यानतर १७५३च्या जानेवारीत भालकीहून बाळाजी बाजीराव श्रीरंगपट्टणच्या (११) स्वारीस गेले. अँडफ्नै भालकीच्या तहापर्यंत बरीवाईट हकीकत दिली आहे. पुढे १७५३ च्या जानेवारीत, तो ह्मणतो, शिंदे, होळकर हिंदस्थानांत गेले व बाळाजी बाजीराव पण्यास परत आले. परंतु, ही दोन्ही विधाने विश्वसनीय नाहीत. शिंदे १७५३ च्या मेपर्यंत देशी चांभारगोंद्यास राहिले (पत्रे व यादी ३४०). होळकर मात्र हिंदुस्थानांत गेले. बाळाजी बाजीराव पुण्यास न जातां, भालकीहून थेट श्रीरंगपट्टणास गेले ( पत्रे व यादी १४). काव्येतिहाससंग्रहांतील पत्रे, यादी वगैरेंतील नंबर १४ हे पत्र शके १६७४ च्या पौषांतल्या वद्य सप्तमीला ( पौष बहुल पंचमी ह्यणून तेथें चुकून पडलें आहे ) ह्मणजे २५ जानेवारी १७५३ ला लिहिले आहे. हे पत्र हरपन्हळीच्या मुक्कामाहून लिहिले आहे. अर्थात काव्येतिहाससंग्रहकार सुचवितात त्याप्रमाणे हे पत्र कर्नाटकच्या ह्मणजे श्रीरंगपट्टणच्या स्वारीत असतां बाळाजी बाजीरावाने लिहिले आहे. ह्यावरून उघड आहे की, १७५३ च्या जानेवारीत श्रीरंगपट्टणची स्वारी सुरू झाली. ही स्वारी पॅट्डफ्नें अजीवात गाळली आहे. भालकीचा तह झाल्यावर सबंदं १७५३ सालभर बाळाजी बाजीरावाच्या हालचालींचा त्याने विलकुल हिशेब दिला नाही. १७५४ त होळीहोनूरची स्वारी बाळाजीने केली एवढे मात्र त्याने पुढे लिहिले आहे. १७५३ तील श्रीरंगपट्टणची स्वारी त्याच्या लक्षांतून अजीबात गेली. ही स्वारी कांहीं लहानसहान नव्हती. ही १७५३ च्या जानेवारीपासून जूनपर्यंत चालली होती. ही स्वारी त्याला माहीतच नव्हती तेव्हा त्याने तिची कारणे व परिणाम दिले नाहीत हे स्पष्टच आहे. १७५४ तील होळीहोनूरच्या स्वारीचा त्याने थोडासा उल्लेख केला आहे. ती स्वारी करण्यास कारणे काय झाली हे त्याने मुळीच सांगितले नाही. १७५४ च्या जूनांत होळीहोनूरच्या मोहिमेहून परत आल्यावर रघुनाथरावदादाला बाळाजीने गुजराथेंत पाठविलें ह्मणून पँट्डफ् ह्मणतो. परंतु, १७५४ च्या जानेवारीत रघुनाथराव कंभेरीच्या वेड्यास लागले होते हे या पुस्तकांतील १६१ व्या टीपंत सप्रमाण सिद्ध करून दाखविले आहे; त्याअर्थी १७५४ च्या जूनानंतर रघुनाथराव गुजराथेंत गेला हैं ग्रेन्डफ्- ह्मणणें निवळ चुकीचे आहे हे उघड आहे. होळीहोनूरच्या स्वारीहून बाळाजी १७५४ च्या जूनांत पुण्यास आले ह्मणून ग्रॅन्ट्डफ् ह्मणतो, परंतु तेंही चूकच आहे. कारण पत्रे व यादीतील नंबर १५ च्या पत्रांत — कर्नाटक, कचेश्वरीहून शके १६७६ च्या ज्येष्ठ शद्ध १३ स आपण पुण्यास आलो.' ह्मणून बाळाजी लिहितो. ह्मणजे १७५४ च्या ३ जुलैला बाळाजी पुण्यास आला असे होते. १७५४ च्या पावसाळ्यानंतर ह्मणजे १७५४ च्या आक्टोबरांत रघुनाथराव गुजराथेच्या स्वारीस निघाला व त्याने अमदाबाद १७५५ च्या प्रिलांत घेतली, असें ग्रॅन्ट्डफ्नै चुकीचे गणित केल्यामुळे रघुनाथरावाची १७५३ तील