पान:मराठ्यांच्या इतिहासाची साधनें.pdf/268

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

१४३ HealEART जमा होतील किंवा नाही हे न कळे. आले वर्तमान सेवेसी विनंति लिहिली असे. श्रीमंत राजश्री रावसाहेबहि येतील ह्मणोन आज्ञा केली, तर बहुतच उत्तम असे. साहेब आल्यावर आमच्या हातें सेवा चाकरी होईल त्याचा मजुरा होऊन येईल. खावंद संनिध असल्यास आह्मी मेवा चाकरी करून दाखवू ते स्वामीस विदित होईल. रामरायास जरूर पाठविणे ह्मणोन आज्ञा , तर म॥ निल्हेस सत्वरीच सेवेसी पाठवून देतो. सेवेसी श्रुत होय. हे विज्ञप्ति. पै॥ छ ७ जिल्हेज, मंगळवार, प्रहर रात्र आवशीची. - - - [७४] ॥ श्री॥ ता.९ सप्तंबर १७५७. श्रीमंत राजश्री रावसाहेबाचे सेवेसीःविनंती सेवक जनकोजी शिंदे कृतानेक विज्ञप्ती. सेवकाचें वर्तमान ता॥ २४ छ जिल्हेज पर्यंत यथास्थित असे. विशेष. श्रीमंत राजश्री नानासाहेबाचें आज्ञापत्र गांच्या पिंपळगांवच्या मुकामी आले होते. त्यांत आज्ञा १६७. विश्वासराव ह्या वेळी १५।१६ वर्षांचा असावा. विश्वासरावाची निजामावलि ही दुसरी स्वारी होय. विश्वासराव १७५५ च्या माात निजामाच्या भावांची टेहळणी शहागडाजवळ करीत होता हैं लेखांक ४८ त लिहिले आहे. त्यावेळी विश्वासरावाचे वय तेरा चवदा वर्षांचे असावें. ह्यावरून अठराव्या शतकांत मनुष्यांच्या पराक्रमाला सुरुवात फार लवकर होत असे असे दिसते. भाऊसाहेब राज्यकारभारांत बारातेराव्या वर्षी पडले. स्वतः नानासाहेब लहान असतांच बाजीरावाबरोबर किंवा चिमाजीआप्पाबरोबर मोहिमेस जात. शिवाजी महाराज तर सातव्या वर्षीच दिग्विजय करूं लागले. परशरामभाऊ पटवर्धनाने बालवयांत मुलुखगिरीचे सुख पहाण्यास आरंभ केला (ऐ. ले. सं. नं. ६). पानिपतच्या लढाईत जनकोजीचे वय काहीं विशीच्या पलीकडे फारसे नव्हते. तो १७५५त मेडत्याच्या लढाईत प्रमुखपणे हजर होता ( भां. सा. ब). पानपतच्या लढाईत नानाफडणिस सोळा सतरा वर्षांचा होता. रघुनाथराव दादा अति मठ ! त्यांनी गुजराथेवरील पहिली स्वारी आपल्या वयाच्या अठगव्या वर्षी केली. रघोजी भोसला बारा वर्षांचा असतांना