पान:मराठ्यांच्या इतिहासाची साधनें.pdf/267

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

तो सत्वर लेहून पाठवावा. आमच्या मते बराच विचार आहे. या गुत्यांतून मोकळे व्हावें, ह्मणून आज्ञा केली. तर जीवन याने लिहिलेयाप्रमाणे झालें तर उत्तम आहे. पंचवीसा लक्षा रुपयाची जाहागीर, दोन स्थळे, चांगलीं, कज्जा न होतां, मोगल देऊन सलूख करीत असले तर बरेंच आहे. हे साधल्यावर पुढे आणखी त्याजपासून घेतले जाईल. दिवसेंदिवस मोंगल क्षीण होत जाईल त्याप्रमाणे वरचेवर पुढे आणखीहि साधले जाईल. ऐसें फरितां मोगलानें अनुसंधान लावून फौज जमा करून बळ धरले तर आमीहि जात आहों. स्वामीच्या तेजप्रांतेकरून मनोदयानुरूप होऊन येईल. जे दिवशी आह्मी बाहेर निघालों तेंच दिवशी चारशें पांचशे स्वार नगरास पाठविलें. त्यांनी किल्याभोवती चौक्या बसवून रसद बंद केली असे. गंगातीरासहि पांचशे साशे स्वार पाठविले असत. जो कोणी आह्मांजवळ येतो त्यासी वर चेवर तिकडेच पाठवितों. आह्मांपाशींहि पाचशे साशे लोक जमा आहेत. मागूनहि फौज येऊन जमा होतच आहे. हळू हळू मजली ती ती चौ चौ कोसांच्या लोकाकरितां करून गंगातीरास जातो, तो लोकहि कुली जमा होतील. इतक्यांत जीवनराव याजकडीलहि पत्रे येतील. त्यांत धातुपोषण आहे किंवा निश्चयात्मक करार करून देतील हेहि कळों येईल. शहरीहून आमची बातमीची खबर आली आहे. मोगलानें तमाम सरदार, मराठे व फिरंगी, यांसी पत्रे पाठविली आहेत. आणि वरचेवर सांडणीस्वार जात आहेत की सत्वर येणे. निजामअल्लीकडे पत्रे व-हाड प्रांती गेली असेत. त्यांनीहि तेथून कुच केले. त्या ब॥ च्यार पांच हजार फौज आहे. शहरांत नवी फौज ठेवितात. याप्रमाणे वर्तमान आले असे. कदाचित् बसालतजंगाने हे कुली जमा व्हावयानिमित्य जीवनरायासी अनुसंधान लावून जमा झाल्यानंतर पुन्हा दुसरी गोष्ट सांगितलीच, तर चिंता काय आहे ? स्वामीच्या आशीर्वादें करून सर्व पादाक्रांत होऊन केला मनसबा शेवटास जाईल. मोगलाची पत्रे सरदारास व निजामअल्लीस व फिरंगीयांसी गेली आहेत. ते १६६ जीवनराव खासगीवाले.