पान:मराठ्यांच्या इतिहासाची साधनें.pdf/266

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

१४१ आहेत त्यांची मनांस आणून आम्हास लिहिणं. त्यांचे लिणें तपसीलवार तीर्थरुपाकडेस सत्वर लिहोन पाठवणं. केवळ सुस्त न राहणे. वरचेवर लिहीत जाणे. हिंदुपत कोठे आहे ? काय करतो ? खेतसिंग कोठे आहे ? काय करतो ? तो ठीक बातमी साद्यंत पत्रीं लिहिणे. तीर्थरुपाकडेस जोडी पाठवण्यास ढील तीळमात्र न करणे. आमी तुर्त दिल्लीस लष्करी श्रीमंताचे असो. श्रीमंत राजश्री दादास्वामी जेनगरास होते तेहि आले. येक दोन रोजी दिल्लीस येतील. भेटी घेऊन बीदा होऊन येतो. तुही आपले कामकाज कैसे करितां ? पैसा टक्का येतो वाट काय करितात, ते लिहिणे. रसद यंदा ||येथें देणे लागत्ये. त्यास ऐवज जोडिला पाहिजे. सावकारहि कोणी मातबर नाही. त्यास तुह्मांकडेस काय ऐवज आहे तो लिहिणे. कांहीं सावकान्यांत मिळाला तरी मेळवोन लिहोन पाठवणे. [७३] ॥ श्री ॥ २२ आगष्ट १७५७. श्रीमंत पा राजश्री पंत प्रधान स्वामीचे सेवेसीः विनंति सेवक दत्ताजी शिंदे कृतानेक विज्ञापना. सेवकाचें वर्तमान तागाईत छ ६ जिल्हेज पर्यंत यथास्थित असे. विशेष. आज्ञापत्र रविवारचे पाठविलें तें येथे सोमवारी दोन प्रहरां पावलें. जीवनराव यांची पत्रे आली ती बजिन्नस पहावयास रवाना केली असत. पाहून आपल्या मतें निश्चय कैसा || लेखांक ७० पहा. पा लेखांक ७३ पासून लेखांक १२० पर्यंतची सर्व पत्रे शिंदखेडच्या लढाईच्या अगोदरची आहेत. ही पत्रं वाई येथील गोविंदराव भानूंच्या जवळची आहेत. ही पत्रे मूळ वाबूराव फडणिसाच्या दफ्तरांत असली पाहिजेत. कारण बाबूराव फडणसि विश्वासरावावरावर शिंदखेडच्या मोहिमेंत होता. इतकेच नव्हे तर मोहिमेची सर्व सूत्रे त्याच्या हाती होती.