पान:मराठ्यांच्या इतिहासाची साधनें.pdf/265

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

१४० [७२] ॥ श्री ॥ जुलै १७५७. राजश्रियाविराजितराजमान्यराजश्री माहादाजी नारायण स्वामी गोसावी यांसी:--स्ने॥ बाळाजी गोविंद नमस्कार विनंति उपरि येथील कुशल जाणून स्वकीय कुशल लिहीत जाणे. विशेष. तुह्मांकडील बहुत दिवस पत्र येऊन तिकडील वर्तमान कळत नाही. त्यास तिकडील सविस्तर वर्तमान लिहीत जाणे. खेतसिंगांकडील अनुसंधान श्रीमंत राजश्री दादास्वामीकडे गेले. वकील मातबर गेले. येथे कळलें. व श्रीमंतीहि आह्मांस लिहिले की वकील आह्मांकडेस आले. तुह्मांकडे कांहीं बोलीचाली आली किंवा नाहीं तें लिहोन पाठवणे. श्रीमंताकडील कारकूनहि गेले. ऐसें येथे ठीक कळले. आणि तुह्मीं तिळमात्रहि संभूत लिहिलें नाहीं हे अपूर्व भासतें ! असो. कारकून गेले ते कोठे आहेत ? काय करितात ? कोणाचे अनुसंधानाने गेलें ? तें तपसीलवार वर्तमान ठीक मनांस आणन आह्मांस लिहोन पाठवणे. देशी तीर्थरुपासहि तपशीलवार लिहोन पाठवणे. म्हणजे तेथे जी खबरदारी करणे ती करतील. ठीक बातमी हिंदुपतीची व खेतसिंगाची व कारकून बदेलखंडांत गेले १६५ हिंदुपत बुधेले याने अमानसिंगास ठार मारले व आपला धाकटा भाऊ दिवाण खेतसिंग यास हाकून दिले. खेतसिंग रघुनाथराव दादाकडे आश्रा मागण्याला गेला; परंतु हिंदुपतीला गोविंदपंत बुंदेले व त्यांचे पुत्र बाळाजी गोविंद यांचा आश्रा असल्यामुळे खेतसिंगाची बरेच दिवस पेशव्यांच्या दरवारांत दाद पोहोंचली नाही ( पत्रे व यादी११०). शेवटी काही प्रांत खेतसिंगांस हिंदपतीकड़न पेशव्यांनी देवविला. ह्याचवेळी, माधवसिंग जयनगरकर, रामासँग मेडतेवाले व पृथ्वीसिंग पन्नावाले इत्यादि रजपूत लोकांची राजकारणे पेशव्यांच्या दरबारी लागली होती. खेतासंगाकडील राजकारण रघुनाथरावाकडे जावें व त्याची आपल्याला बातमीहि कळू नये ह्याबद्दल बाळाजी गोविंद आपल्या कारकुनाला दोष देत आहे व तो दोष देणे रास्त आहे. गोविंदपंत बुंदेल्यांना जर बुंदेलेखंडाचे मुख्याधिपति केले होते तर त्यांच्या प्रांतांतील राजेरजवाड्यांच्या तकरारी त्यांच्या द्वारा गेल्या ह्मणजे ठीक पडेल असें गोविंदपंताचे मत होते. परंतु, गोविंदपंत गैरविश्वासी कामें करतात असा संशय आल्यावरून पेशव्यांना स्वतंत्रपणे बुंदेलखंडांतील राजांची व्यवस्था करणे भाग पडले असे दिसते. गोविंदपंत खरोखरच विश्वासार्ह माणूस नव्हता हे पुढच्या एका पत्रांत कलमवार सिद्ध केले आहे.