पान:मराठ्यांच्या इतिहासाची साधनें.pdf/263

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

बंगाला, ये प्रांतीं स्वारी केलियास चार रुपये आकारतील. कपाळ स्वामीचें २५ जुलैच्या जवळ जवळ आहे. ज्येष्ठ वद्य ७ अथवा ३० जून १७५५ ही जयाप्पाच्या मृत्यूची तारीख ठरते. आतां जयाप्पासारखा मोठा सरदार वारला, तेव्हां त्याच्या मृत्यूची बातमी लगेच त्याच दिवशी किंवा फार झाले तर दुसऱ्या दिवशी नानासाहेब पेशव्यांना गेली असावी असाहि तर्क करणे साहजिक आहे. ह्या तर्काप्रमाणे २४ किंवा २५ जुलै १७५५ ही जयाप्पाच्या मृत्यूची तारीख होते. जयाप्पासंबंधी येथे विचार चालला आहे त्याअर्थी जयाप्पाच्या मारवाडांतील मोहिमेसंबंधी भाऊसाहेबांच्या बखरीत कित्येक चुका झाल्या आहेत त्या येथे दाखवून दिल्यास योग्य होईल. (अ) कुंभेरीचा वेढा झाल्यावर व जाटांशी तह केल्यावर रघुनाथरावदादा देशी परत आले व मल्हाररावानें इंदुरास येऊन छावणी दिली असें भाऊसाहेबांच्या बखरीत (आवृत्ति दुसरी पृष्ठ १२) त झटले आहे. परंतु कुंभेरीचा वेढा १७५४ च्या मेंत संपल्यावर (लेखांक ३५) दादासाहेब व मल्हारराव दिल्लीच्या कामास गेले (लेखांक ३९); ते १७५५ च्या पावसाळ्यानंतर दसऱ्यास पुण्यास येऊन सावनूरच्या स्वारीस मिळाले. मल्हाररावाला इंदुरास काही दिवस स्वस्थपणे राहण्यास वेळच मिळाला नाही. (ब) जयाप्पा एकदम कुंभेरीहून निघाला तो नागरास आला, तेथेच त्याची व बिजेसिंगाची प्राणांतिक लढाई झाली व नंतर कुंभेरीहून निघाल्यानंतर सव्वा वर्षाने झणजे पंधरा महिन्यांनी जयाप्पा मारला गेला, इत्यादि विधाने ह्या वखरीच्या १२ पासून १८ पृष्ठांत केलेली दृष्टोत्पत्तीस येतात. जयाप्पा कुंभेरीहून निघाला तों मेडल्यास त्याने बिजेसिंगाला गांठला. नंतर त्याने कृष्णगड घेतला; व पुढे तो नागोरास गेला. जयाप्पा कुंभेरीहून २ जुलै १७५४ स निघाला ( पत्र क यादी ३२ ) व ३० जून १७५५ ला तो मारेकऱ्यांच्या हातून मारला गेला ( पत्रे व यादी ४५१). तेव्हां कुंभेरीहून निघाल्यापासून मरेतोंपर्यंत सुमारे १२ महिन्यांचा अवधी गेला. कृष्णगड घेऊन व मेडत्याची लढाई खेळून नागोरच्या वेढ्यास जयाप्पा सुमार १७५४ च्या नोव्हेंबरांत लागावा. तेथपासन मरेपर्यंत आठ महिने होतात. तेव्हां नागोरचा वेढा सरासरी आठ महिने चालला असतां जयाप्पा मेला. (क) मेडत्याच्या लढाईत दत्ताजी शिद होता ह्मणून हा बखरकार लिहितो. परंत तो १७५५ च्या मार्चात विश्वासरावाबरोबर शहागडाजवळ होता (लेखांक ४८) व तेथन लवकरच जयाप्पाच्या मृत्यूच्या पूर्वी नागोरास आला असावा. (ड) रामसिंग व बिजेसिंग ह्यांची वाटणी करून देऊन सावनूरच्या लढाईच्या अगोदर दत्ताजी चांभारगोंद्यास आला व तेथें पेशव्यांनी त्याचे सांत्वन केले असेंहि हा बखरकार लिहितो. परंतु नागोरास महिना दोन महिने राहून (पत्रे व यादी ४५१) व नंतर बुंदीकोट्याच्या राणीस मदत करून शिंद्यास चांभारगोंद्यास येण्यास बराच वेळ लागावा व सावनूरची स्वारी अधीमुर्धी झाल्यावर मग शिंदे देशी यावे असा तर्क आहे. ह्यासंबंधी १५० टीपेच उत्तरार्ध पहा