पान:मराठ्यांच्या इतिहासाची साधनें.pdf/262

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

अबदाली आला तरी त्याचे पारपत्य केलेच पाहिजे. न आला तरी कासी, ग्रांटडफ्नै अजीबात गाळली आहेत. ती क्षुल्लक होती ह्मणून ती त्याने वगळली असा अर्थ नाही; तर त्या प्रकरणांची त्याला माहिती न मिळाल्यामुळे फारशी ओळखच नव्हती हैं तो स्वतःच कबूल करतो. जयाप्पाच्या मृत्यूची तारीख आपल्याला कोठें सांपडली नाही ह्मणून ग्रांटडफ्नें आपल्या इतिहासाच्या एकविसाव्या भागांत झटले आहे. त्याला तारीख सांपडली नाहीं इतकेच नव्हे तर जो सन सांपडला आहे तोहि अगदींच चुकलेला आहे. ग्रांटडफ्नै जयाप्पाच्या मृत्यूची हकीकत मागला पुढला काही एक संबंध नसतां मध्येच एका ठिकाणी घुसडून दिली आहे. ग्रांटडच्या मते जयाप्पाच्या मृत्यूचें साल इ. स. १७५९ हे होय. परंतु तें साल खरे नव्हे हे पुढील तारखांवरून कळून येईल. १७ मे १७५४ पर्यंत कुंभेरीचा वेढा चालला होता (लेखांक ३५). तेव्हां कुंभेरीच्या वेढ्याचें साल काव्यतिहाससंग्रहकार ह्मणतात (भाऊ साहेबाची बखर पृष्ठ १२) त्याप्रमाणे १७५३ नसून १७५४ होय. पुढे जयाप्पा १० रमजान खमसखमसैनांत ह्मणजे २ जुलै १७५४ त रघुनाथरावाच्या सैन्यांतून कदाचित् कुंभेरीहून (भाऊसाहेबाची बखर पृष्ठ ११) किंवा बहुशः मथुरेहून ( पत्रे व यादी ४५१) किंवा कदाचित् दिल्लीहून (पत्रे व यादी ३२) निघून मारवाडास गेला तो १६ सवालीं ह्मणजे ६ आगष्ट १७५४ स मेडत्यास पोहोंचला ( लेखांक ३७ ). २० आगष्ट १७५४ च्या अगोदर नयाप्पानें कृष्णगड घेतला ( पत्रे व यादी ३९८); व १५ नोव्हेंबर १७५४ च्या एक महिना अगोदर त्याने विजेसिंगाला मेडत्याच्या लढाईत चीत केलें ( पत्रे व यादी ३९३ ). १५ जानेवारी १७५५ त नागोरचा वेढा चालला होता (लेखांक ४४). ४ मार्च १७५५ च्या सुमारास बिजेसिंगाने मिरता वगैरे ठाणी लुटली; ती जयाप्पाने पुन्हां घेतली (लेखांक ४८). १२ जून १७५५ त जयाप्पाने गोपाळराव गणेशास पत्र लिहिले (लेखांक ४९). त्यानंतर सन सीतखमसैनच्या १५ सवाल ह्मणजे २५ जुलै १७५५ चे रामाजी अनंत दाभोळकर याचे नानासाहेब पेशव्यांस पत्र आले, त्यांत जयाप्पाच्या मृत्यूची वार्ता लिहिली होती ( पत्रे व यादी ३५२). ह्यावरून जयाप्पा २५ जुलै १७५५ च्या अगोदर वारले हे उघड आहे व ग्रांटडफ्चे १७५९ साल चुकले आहे हे स्पष्ट होते. आतां हे १५ सवालचे पत्र सीत सालचेंच कशावरून ? तर पत्रे व यादी (३८६ ) त जयाप्पाच्या मृत्यूचा उल्लेख केला आहे व तें पत्र २२ जिल्हेज सन सीत खमसैन मय्या व अल्लफांत लिहिले आहे. त्याच पत्रांत ३५२ पत्राचा उल्लेख केला आहे. ह्यावरून १७५५ हे जयाप्पाच्या मृत्यूचें साल होय हे खास आहे. आतां ह्या मृत्यूची तीथ कोणती ते पाहूं . पत्रे व यादी ( ४५१) त जयाप्पा ज्येष्ठ वद्य ७ मसि मारले गेले ह्मणून अंताजी माणकेश्वर लिहितो. सीत साली ज्येष्ठाचे दोन महिने होते. पैकी दुसरा ज्येष्ठ १५ सवालच्या ह्मणजे १८