पान:मराठ्यांच्या इतिहासाची साधनें.pdf/261

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

दोनचार हजार फौज सदाशिवराव रामचंद्र याचे कुमकेस पाठविली तरी ते काम होई ऐसें आहे. हिकडे दत्ताजी शिंदे याची रवानगी करावी. जर मुळी गुजरायत नव्हताच इत्यादि गोष्टी कळून येतील. रघुनाथरावाची गुजराथेवरील पहिली स्वारी १७५० त झाली (लेखांक २). परंतु ह्या खारीत त्यांच्या हातून गुजराथेत फारसे काम झाले नाही. रघुनाथरावाची गुजराथेवरील दुसरी स्वारी १७५१ त झाली. ह्या स्वारीत कांहीं काम करावयाचे तों निजाम पुण्यावर चाल करून आला; तेव्हां दादांना देशी परत यावे लागले. नंतर देशी स्वस्थता झाल्यावर दमाजी गायकवाडास पुढे पाठवून १७५२ च्या जानेवारी- फेब्रुवारीत ( पत्रे व यादी ३६३ ) रघुनाथरावदादा गुजराथेवरील तिसऱ्या स्वारीस गेले. ते गंगातीराने गुजराथेत उतरून २५ जानेवारी १७५३ च्या सुमारास तिकडील मुलुकाचा बंदोबस्त करूं लागले (पत्रे व यादी १४ ). २७ मार्च १७५३ त अमदाबाद रघुनाथरावाशी झुंजत होती ( पते व यादी २८). १७५३ च्या एप्रिलांत अमदावाद सर करून जुनांत ते थालनेरास आले व तेथून १० सप्टंबर १७५३ त हिंदुस्थानांत जावयास डेरे दाखल झाले (लेखांक २७). २० मार्च १७५४ च्या अगोदर सवंद गुजराथ मराठ्यांकडे झाली, इतकेंच नव्हे, तर द्वारकाहि झाली, असें वासुदेव दीक्षिताने रघुनाथरावाला लिहिल्यावरून रघुनाथरावाने ती गोष्ट २० मार्च १७५४ च्या पत्रांत कबूल केली (पत्रे व यादी २७). २० मार्च १७५४ नंतर दादांना मथुरा हस्तगत झाली ( पत्रे व यादी २७ ). १ आगस्ट १७५४ त रघुनाथराव दिल्लीस होते ( पत्रे व यादी ३१, ३२). एप्रिल (वैशाख ) १७५५ त रघुनाथराव रोहिलखंडांतून दिल्लीस परत आले ( ४५१ पत्रे व यादी ). ह्यावरून १७५५ च्या एप्रिलांत रघुनाथराव दिल्लीस होते हे स्पष्ट आहे. १७५३ सालच्या जूनपर्यंत दादा गुजराथेत होते. त्या वेळी त्यांनी अमदाबाद सर केली, परंतु तीत कायमचा अंमल बसविला नाही: तो १७५५ च्या एप्रिलांत श्रीपतराव शेणवी ह्मणून पेशव्यांच्या पदरचा कोणी सरदार होता त्याच्या हस्तें बसविला. येणेप्रमाणे १७५३ च्या एप्रिलांत रघुनाथरावाने अमदावाद घेतली ह्यांत शंका नाही, असें रा० नातू महादजीच्या चरित्रांत लिहितात तें खरे आहे. परंतु अमदाबादेत कायमचा अंमल १७५५ एप्रिलांत वसला हे जे ग्रांडडफ् म्हणतो तेंहि कांहीं चूक नाही. ग्रांड डफ्ची चक एवढीच आहे की १७५५ तील अमदाबादेच्या कायमच्या अंमलासंबंधाने त्याने रघुनाथरावाचें नांव जोडले आहे. रघुनाथरावाच्या गुजराथेतील दुसऱ्या स्वारीचा शक चुकल्यामुळे ग्रांड डफ्नै पुढें बऱ्याच चुक्या केलेल्या आहेत. त्या सर्वात मोठी चूक ह्मटली ह्मणजे जयाप्पाच्या मृत्यूसंबंधी होय. कुंभेरीचा वेढा, मेडत्याची लढाई, नागोरचा वेढा, रघुनाथरावाची राहिलखंडांतील कुमाऊच्या पहाडापर्यंत मोहीम, बुंदेलखंड, रजपुताना, अंतर्वेद, रोहिलखंड, इत्यादि प्रदेशांत मराठ्यांच्या सरदारांची कारस्थाने, मोहिमा, अंमल, इत्यादि प्रकरणे