पान:मराठ्यांच्या इतिहासाची साधनें.pdf/260

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

सबब लिहिले असे. इटावें, फफूंदेचा ऐवज अंताजीस देववावा लागेल. सर्व स्वामींस कळावे ह्मणोन लिहिले असे. बहुत काय लिहिणे. जुने महाल अंतर्वेद वगरे आहेत. त्याची रसद आह्मी घेत नाही. जरूर जाणोन लिहिले असे. बहुत काय लिहिणे. हे विज्ञापना. पै॥ छ २४ जिल्काद, श्रावण वद्य ११. - - ॥ श्रीशंकर ॥ १२ जुलै १७५७. सेवेसी विज्ञापना. अबदाली जर कदाचित् मार्गशीर्षपौषांत आला तरी इकडे मनसुबा भारीच आहे. गुजरातेची मजकूर थोडकाच आहे. तिकडे होते, परंतु त्यांना कोठे कर्ज झाल्याचे लिहिलेले नाही. दादांना कर्ज कोणच्या कारणाने झालें ह्या मुद्याचा खुलासा केलेला कोठे बखरीत दिसत नाही. दादा खुषीत असतां त्यांना फसवून मल्हाररावाने तर ह्या स्वारीत मिळालेला पैसा लाटला नसेल? अबदालीने मुलूख लुटून नेला व त्याच्या पाठोपाठ दादा गेले तेव्हां त्यास किफायत कांही एक झाली नाही ह्या ह्मणण्याचा “ पेंढारी व लष्कर कुबेर जाहाले” ह्या ह्मणण्याशी विरोध दिसतो. बहुशा मल्हाररावाने दादांस फसविले असावें हाच तर्क खरा वाटतो. पैसे उपटण्याकरितां मल्हारराव काय काय खेळ करीत असत हे लेखांक ७१ त नामी वणिलें आहे. १६१ ह्यावरून व लेखांक ५२ यावरून १७५७ तहि गुजराथेकडे अमदाबाद इत्यादि ठिकाणी गडबड झाली होती असे दिसते. अमदावाद " कायमची” १७५५ एप्रिलांत अमलांत घेतली ह्मणून मराठी दफ्तरावरून डफ लिहितो व हे त्याचे ह्मणणे खरे आहे. परंतु ती १७५३ च्या एप्रिलांत रघुनाथरावाने सर केली होती हे खरे असून त्याला ग्राह्य नाही. कां की रघुनाथरावाची गुजराथेवरील दुसरी स्वारी १७५४ त सुरू झाली असें घेऊन त्याने गणित केले आहे व हेच त्याच्या चुकीचे मुख्य कारण आहे. रघुनाथरावाची गुजराथेवरील दुसरी स्वारी कधी झाली व तो १७५२, १७५३, १७५४, १७५५, ह्या साली कोठकोठे होता हे कळले असतां रघुनाथरावाने १७५३ च्या एप्रिलांतच अमदाबाद सर केली असली पाहिजे व १७५५ च्या एप्रिलांत मराठ्यांच्या दुसऱ्या कोणी सरदारांनी तिजवर कायमचा अंमल बसविला व रघुनाथराव त्या वेळी ह्मणजे १७५५ एप्रिलांत