पान:मराठ्यांच्या इतिहासाची साधनें.pdf/259

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

१३४ फावले. अंतर्वेद वगैरे अंमल उठला होता, याजमुळे सखारामपंताबराबर पांच हजार फौज देऊन सखाराम व विठ्ठलपंत व गंगोबा ऐसे वीस हजार फौज अंताजी देखील अंतर्वेदीत पाठवून बंदोबस्त केला. वैशाख व ज्येष्ठ दोन महिने आमास रिकामे सांपडले. त्यामध्ये पहिली गडबड जाहाली होती ते वारली; व जेपूरचे अकरा लक्ष घेतले. त्यांपैकी साहा तुर्त व पांचाचा ओला आहेत. ऐवज येईल तेव्हां प्रमाण ह्मणावा. याप्रमाणे जाहालें. सारांश, आह्मांस रुपयांची ओढ भारी आहे; यास्तव स्वामींनी ऐवज देववावा. असो. स्वामींसहि ओढ असेल, कर्ज करीत असतील; याजमुळे आह्मीहि कळेल तसें चालवू . परंतु, कडाकुरा येथील तरी ऐवज गोविंद बल्लाळ व गोपाळराव गणेश यांजपासून रसद देववावी. हिकडे महागाई फार, याजमुळे लोकही कर्जदार झाले आहेत ; यास्तव जरूर जाणोन लिहिले असे. तरी याप्रमाणे करावे. येविसी अलाहिदा पहि पाठविली आहेत. गोविंदपंतापासून कदाचित् स्वामींनी रसद घेतली असली तरी मोबदला ऐवज त्याजपासून आमास देववावा. दहा लक्ष दोघांकडील होतील. याखेरीज मग जसें बनेल तसे करतो. स्वामीपावेतों स्वामींचे दयेनें फौजेचा बोभाट येणार नाही. यंदा दिवसगतीमुळे ऐवज वसूल न जाहाला; तेव्हां निरुपाय होऊन त्याने हे पत पुण्यास लिहिले. पुढे मल्हाररावांनी अडथळे अतिशयच जेव्हां आणिलें, तेव्हां दादांनी मामलत रगडून करून कशीबशी पोट भरण्याची व्यवस्था केली. १६० ह्यावरून दादा सदा कर्जवाजारी असत असे दिसते. १७५४ च्या मोहिमेंतहि दादा कर्ज करून आले होते व ते त्यांनी धोंडीबा नाईक नवाळे ह्याच्यापासून घेतले होते (लेखांक ६९). तेव्हां दादा इतर सरदारांप्रमाणे स्वारीहून पैसे कमावून न येतां गमावून येत असत असा जो त्यांच्यासंबंधी बोभाट होता ह्मणून बखरीत लिहिले आहे ते खरे आहे असे दिसते. ह्या दिल्लीलाहोरच्या स्वारीत असा बोभाट येऊ द्यावयाचा नाही असा दादांचा विचार होता हे ह्या पत्रावरून उघड आहे. परंतु हा विचार पुढे खोटा ठरला हे इतिहासप्रसिद्ध आहे. लाहोरच्या मोहिमेंत “ लुटीने पेंढारी व लष्कर कुबेर आहले," ह्मणून भाऊसाहेबांच्या बखरीत (पृष्ट ३६ ) ह्मटले आहे. मग दादाच तेवढे ऐशी लक्ष रुपये कर्ज करून कां आले ते कळत नाही. मल्हारराव होळकर, त्यांच्या बरावर