पान:मराठ्यांच्या इतिहासाची साधनें.pdf/25

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

व्यवस्थित वर्गीकरण आणि त्यांची बारीक फोड व उकल त्याच्या हातून झाली नाही. त्यामुळे व कांहीं जरूरीचे कागदपत्र त्याला न मिळाल्यामुळे ह्या मोहिमा त्याने गाळल्या असे दिसते. वर दिलेल्या बेचाळीस मोहिमा अगदी ठळक ठळक आहेत. त्यांपैकी ग्रांट डफ्नै कोणकोणत्या गाळल्या आहेत किंवा त्या झाल्या हे माहीत असून अस्सल लेखांच्या कोताईमुळे कोणकोणत्या मोहिमांचा निवळ नामसंकीर्तनापलीकडे जास्त उल्लेख त्याने केला नाही किंवा व्यवस्थित वर्गीकरण न केल्यामुळे कोणकोणत्या मोहिमांची त्याने गफलत केली आहे ते खाली लिहितो. रघुनाथरावाच्या (१) १७५०, (२) १७५१, (३) १७५२, (४) १७५३ व (५) १७५६ ह्या सालांतील गुजराथ व खानदेश ह्या प्रांतावरील मोहिमा ग्रॅन्ट डफ्नें अजीबात गाळल्या आहेत. रघुनाथरावाची १७५३ ची अमदाबादेवरील मोहीम त्याने १७५५ सालांत नेली आहे. १७५५ सालांत रघुनाथराव दिल्लीस होते हे त्याला माहीत नव्हतें; हैं पुढील पत्रांतील टीपांत सविस्तर सिद्ध करून दाखविले आहे (टीप १६१). रघुनाथरावाची १७५४ (जानेवारी-जून ) तील रजपुतान्यांतील (६)स्वारीची (कुंभरीचा वेढा इ.) व १७५४ (सप्टेंबर-डिसेंबर ) तील रोहिलखंड, कुमाऊ, ह्या प्रदेशांवरील ( ७ ) मोहिमेची हकीकत त्याने दिली नाही. रघुनाथरावाच्या १७५७ तील (८) दिल्लीवरील व १७५८ तील (९) लाहोरावरील मोहिमांचा त्याने त्रोटक व तोहि बराच चुकीचा वृत्तांत दिला आहे. रघुनाथराव वस्तुतः १७५७ त माळव्यांत गेला असून तो १७५६ च्या शेवटी गेला असें डफ ह्मणतो. रघुनाथराव १७५७ च्या जूनांत व सप्टेंबरांत दिल्लीस होता हे १५३व्या टीपेंत स्पष्टपणे दाखवून दिले आहे. अबदाली १७५५ त दिल्लीस आला, मथुरा वगैरे शहरें त्याने त्याच साली घेतली, मग लवकरच काबुलाला तो परत गेला व १७५७ च्या सप्टंबरांत तो दिल्लीस येऊन बसला, इत्यादि भ्रामक विधाने त्याने केली आहेत. तीहि मी १५३ व्या टिपेत खोडून काढिली आहेत. तसेंच १७५४ व १७५५ आणि १७५७ व १७५८ रजपुताना, माळवा, बुंदेलखंड, काशी, प्रयाग, अयोध्या, व अंतर्वेद इत्यादि प्रदेशांतील संस्थानिक, पाळेगार, मवासी, इत्यादि मंडळीवरही रघुनाथरावाने स्वाऱ्या केल्या आहेत, त्यांसंबंधी माहिती घुट्डफ्च्या ग्रंथांत नाही. जयाप्पाच्या (१०) नागोरच्या वेढ्यासंबंधी तर त्याने फारच आश्चर्यकारक चुकी केली आहे. नागोरचा वेढा १७५५ त चालला होता व जयाप्पा तो वेढा चालला असतांना ज्येष्ट वद्य ७ मीला ह्मणजे ३० जून १७५५ ला मारला गेला अशी वास्तविक गोष्ट आहे. असे असून ग्रॅन्टडफ्नै जयाप्पाच्या मृत्युचें साल १७५९धरले आहे व मधील चार वर्षांत जयाप्पासारिख्या चळवळ्या शिपायाने केलें काय ह्याचा हिशेब अर्थात् कांहींच दिला नाही. हीहि चूक मी १६१ व्या टीपेंत जयाप्पाच्या मृत्यूच्या तारखेसुद्धा दाखवून दिली आहे. एकंदरीत रघुनाथराव दादांच्या बहुतेक सर्व स्वा-यांसंबंधी, अँडफ्चे अज्ञान आश्चर्य करण्यासारिखे आहे. जयाप्पाच्या मारवाडांतील मोहिमेसंबंधी, त्याच्या मृत्यूसंबंधी व त्याच्या मृत्यूनंतर दत्ताजीनें मारवाडांत केलेल्या