पान:मराठ्यांच्या इतिहासाची साधनें.pdf/258

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

मागील स्वारीमध्ये आह्मीं कर्ज दहा लक्ष पर्यंत घेतले त्यामध्ये त्यांणी परगणे तोडून दिले होते. त्याचा वसूल करून धोंडीबा नाईक यास देणे ह्मणोन त्यास चाकरीच सांगितली होती. ते वसूल करीत होते. मध्ये वजिरांनी लबाडी करून थोडे बहुत रुपये परगण्यापैकी घेतले. याजमुळे त्या बखेड्यांत वगैर बखेड्यांत होते. सारांश लबाड तर आहेतच, परंतु फार हरामखोरी केवळ आंगीं लावीन झटल्यास नाही. स्वामींनी लिहिले की मल्हारबास पुरतें हाती घेऊन मग पारपत्य करावें. दामोदर व पुरुषोत्तम यांची जप्ती करावी व त्यांस दूर केलें अशी शौरत करावी झणजे हलके पडतील ह्मणोन आज्ञा. तरी इतकें कांहीं संकट नाही. मल्हारबाचा त्याचा पेंचच आहे. दिल्लीहून आणीन झटल्यासहि शंभर राऊत धरून आणतील. तेथें कांहीं विशेष नाही. सांप्रत दामोदर तर वारले. बापू व दामोदर येथे आणून स्वामींकडे पाठवू इतका अगाध त्याचा मजकूर काय आहे ? परंतु केवळ बेअबरू करावे इतका अन्याय नाही. थोडे बहुत अन्याय, तरी बहुतच आहेत, त्याप्रमाणे पारपत्य करावेच लागेल. स्वामी करतीलच. बहुत काय लिहिणे. हे विज्ञापना. पै॥ छ २४ जिलकाद. श्रावण वद्य एकादशी. [७.] ॥ श्रीशंकर ॥ १२ जुलै १७५७. सेवेसी विज्ञापना. यंदा फौज चैत्र वैशाखांत आली व अबदाली चैत्रपर्यंत मथुरेवर होता. याजमुळे आमास एखादा मनसुबो करावयास न - १५९ कांहीं मनसुबा करून पैसे मिळवावे व पुण्याहून पैसे मागविण्याचे प्रयोजन पडू नये असा रघुनाथरावाचा मनापासून इरादा होता. परंतु, अबदालीने दिल्ली भोंवतील सर्व प्रांत बेचिराख केल्यामुळे त्याचा निरुपाय झाला. मल्हारवाहि अडथळे आणूं लागले.