पान:मराठ्यांच्या इतिहासाची साधनें.pdf/257

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

सानमंद झाला. स्वामींची मरजी कांहींक दिवसांपासून की किल्ला अहमदनगर सरकारांत मागावा, हे त्यास कळलें होतें व सांप्रत तीर्थरूप रा॥ जीवनराव केशव यांचेहि सांगितल्यावरून स्वामींची मर्जी त्यास पुरती कळली त्याजवरून स्वामींची खातर जरूर जाणून किल्ले अहमदनगर स्वसंतोष स्वामीचे नजर केला. स्वामींनी घ्यावयासी सनद करून देता येत नाही. येथील सर्व लोक शब्द लावतील. यास्तव परवानगी दिधली पुरे. स्वामीस तो किल्ला घेणें कांहीं कठीण नाही. परंतु येथील परवाने जागिरीचे जाल्यानंतर विनंति लिहूं तेव्हां किल्यास माहसरा करावा, आतांच आरंभ न करावा, व चर्चाहि या गोष्टीची न व्हावी. काहींक दिवस गोष्ट चित्तांतच राहिली पाहिजे. कविजंग तेथे आहे. त्याणे तेथे राहिल्याचीहि चिंता नाही. कदाचित त्याने तेथें नसावें, नवाबापाशी यावे, अशी सलाह असलिया आज्ञा सादर व्हावी. ह्मणजे त्यास तेथून येथे आणावयाचा प्रयत्न केला जाईल. सविस्तर तीर्थस्वरूप राजश्री जीवनराव केशव यांचे विनतिपत्रावरून अर्थ कळों येईल. हे विनंति. र॥ छ ११ सवाल. [६९] ॥ श्रीशंकर ॥ १२ जुलै १७५७. सेवेसी विज्ञापना. बापूजी महादेव व पदामोदर महादेव वगैरे वकील यांचें पारपत्य करावें, जप्ती करावी, कां की ते हुजूर येत नाहीत व चाकरी यथास्थित करीत नाहीत ह्मणोन आज्ञा. ऐशीयासी, त्यांचे पारपत्य करणे अगाध नाही. एक हुजूर आले नाही हे तो खरेच. परंतु त्यासहि एक सबब होता. . कोणता ह्मणावा ? धोंडीबा नाईक नवाळे यांजपासून १५८ अहमदनगरचा किल्ला कविजंगाने पुढे उदगीरच्या लढाईच्या अगोदर पेशव्यांना प्रसिद्धपणे दिला. सध्यां गुप्तपणे तो पेशव्यांच्या हाती पडल्यासारखाच होता. | पत्रे व यादी १६२ त ह्या दामोदर महादेवाचा उल्लेख आहे.