पान:मराठ्यांच्या इतिहासाची साधनें.pdf/256

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

१३१ दिल्लीसुभा व लाहोर हे दोनहि सुभे जप्त करा. ह्मणजे चार रुपयेहि येतील व नक्षहि होईल. अबदालीचा पिछा केला असें होईल. परंतु यांणी लटकींचे' लचांडे माधवसिंगाकडे काढून तीन महिने लांबविले. आझांस भक्षावयास नाही. कर्जहि न मिळे. ऐसें झालें. सांप्रत मल्हारबाशिवाय मामलत माधवसिंगाशी जी साधेल ती करून पुढे जाणार. येथील कारभार ओढला. फार लटकींच लचांडे काढावीं. ऐसे केल्याने कारभार शेवटास जात नाहीं. तपशील फारच आहेत. स्वभाव स्वामीस वाकीफ आहेच. परंतु सूचना मात्र लिहिली आहे. स्वामीनी फिकीर न करावी. आह्मी आपले कृपेकरून कारभार उत्तम प्रकारे शेवटास नेतों. कळावें. छ १ सवाल. बहुत काय लिहिणे. हे विनंति. पै॥ छ २० सवाल. [६८ ] पै॥ छ १६ सवालसमान. श्री भवानी॥. २९ जून १७५७. १५ श्रीमंत सद्गुणमूर्ति साहेबाचे से॥ आज्ञाधारक कृष्णाजी त्रिंबक सा॥ नमस्कार उपरी विनंति. किल्ले दौलताबोंद स्वामींनी शहानवाजखान आपला मित्र जाणून त्यास घेणे ह्मणोन परवानगी पाठविली त्याजवरून व किल्ले मजकूर फत्ते केलियावर मुबारकबंदीची पत्रे पाठविली याजवरून शहानवाजखान फारच संतोष पावला. यह १५४ मल्हारवाचे शिंद्यांशीच वांकडे होते असे नाही. श्रीमंतांशींहि तो खोटेपणा करण्यास चुकत नसे. १५५ हे पत्र १७५७ त निजामाशी झालेल्या शिंदखेडच्या लढाईच्या वेळचे आहे. १५६ दौलताबादेचा किल्ला शहानवाजखानाने १७५७ च्या आगस्टानंतर घेतला ह्मणून ग्राटडफ् ह्मणतो. ह्या पत्रांत १७५७ च्या जूनच्या पूर्वीच शहानवाजखानानें तो आपल्या स्वाधीन करून ठेविला होता असे लिहिले आहे व हेच जास्त विश्वसनीय आहे. १५७ आनंदप्रदर्शनार्थ.