पान:मराठ्यांच्या इतिहासाची साधनें.pdf/255

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

मल्हारबास हाणत गेलों की जशी तशी माधवसिंगाची मामलत विल्हेस लावून तो झांशीस येणार होता. परंतु तसे न करता तो लवकरच ह्मणजे सुमारे एप्रिल १७५७तपरत देशी गेला [ लेखांक ७० ]. असे असून १५ सप्टेंबर १७५७ त अबदालीने दिल्ली लुटली ह्मणून कीन ह्मणतो ते कोणत्या भक्कम आधारावर ह्मणतो ते कळत नाही. तसेच दिल्ली घेण्यापूर्वी, मथुरा, वृंदावन, आग्रा इत्यादि शहरें अबदालीने लुटली व नंतर ११ सप्टंवरांत तो दिल्लीस आला असें कीन ह्मणतो (Fall of the Mogal Empire pp. 38/39). परंतु तें लेखांक ६३ ह्यांतील हकीकतीच्या विरुद्ध आहे. मथुरा, आग्रा इत्यादि शहरें अवदालीने १७५५ त लुटलीं, मध्ये रोग उद्भवला ह्मणून तो कावुलाला परत गेला व तेथून हिंदुस्थानास १७५६ च्या प्रारंभास आला, असें डफ मराठ्यांच्या इतिहासाच्या २१ व्या भागांत लिहितो. परंतु तेंहि ह्या पत्रांशी व कीनच्या ११ सप्टेंबर १७५७ त तो दिल्लीस आला, ह्या मजकुराशी जळत नाही. खरी गोष्ट अशी आहे की अबदाली चैत्रपर्यंत ह्मणजे मार्च १७५७ पर्यंत मथरेवर होता ( लेखांक ७०). त्याने, मथुरा, वृंदावन, आग्रा, इत्यादि शहरें, फेब्रूवारी, मार्च १७५७ त लुटली व नंतर तो एप्रिल १७५७ त देशी परतला. १७५५ त अबदाली हिंदुस्थानांत आलाच नाहीं; तेव्हां तो काबुलाला जाऊन १७५६ च्या प्रारंभी हिंदुस्थानांत परत आला हे ह्मणणेच असंभवनीय आहे. तो १७५६ च्या शेवटी हिंदुस्थानांत आला व १७५७ च्या प्रारंभास त्याने आग्रा, मथुरा इत्यादि शहरे लुटली व १७५७ च्या एप्रिलाच्या शेवटी तो कावलास परत गेला. अर्थात् १७५७ च्या सप्टंवरांत तो दिल्लीस नव्हता. कारण रघुनाथराव १७५७ च्या जुलैंत दिल्लीस जाऊन बसले होते (लेखांक ७१). ११ सप्टंवर १७५७ ह्या तारखंत व ११ सप्टेंबर १८५७ ह्या तारखेत वरावर एका शतकाचे अंतर आहे. ११ सप्टंवर १८५७ त इंग्रजांनी बंडवाल्यांपासून दिल्ली घेतली. तेव्हां १७५७ तल्या ज्या तारखेला अबदालीने दिल्ली घेतली त्याच तारखेला आह्मीं इंग्रजांनी दिल्ली घेतली, तेव्हां हा कांहीं तरी शतसांवत्सरिक दैवी योग आहे, इत्यादि विचार कीनच्या डोक्यात येऊन, त्याने शा. ११ सप्टेंबरावर विशेष भिस्त ठेविली आहे. परंतु अवदाली १७५७ च्या एप्रिल,-मेंत काबुलास गेला असे आमच्या पत्रांत लिहिले असल्यामळे, ११ सप्टेंबर ह्या शतसांवत्सरिक तारखेस अबदाली दिल्लीस आला हे ह्मणणे निव्वळ कल्पना आहे ! तसेंच रघुनाथराव १७५६ च्या शेवटीं माळव्यांत आला असें ग्रांटडफ लिहितो. परंतु लेखांक (५२) ह्यांत रघुनाथराव छ २४ जमादिलावल, सनसव्वांत ह्मणजे १४ फेव्रुवारी १७५७ स इंदुरास आला असे स्पष्ट लिहिले आहे. रघनाथराव इंदरास असतांना अबदाली दिल्लीस होता (५२). दोन तीन महिने अबदाली दिल्लीस रहातां तर दादांनी खास खास गांठले असते. परंतु तो राहिलाच नाही, तेव्हां दिल्लीस जाऊन बसण्याखेरीज व नजीबखानाचें पारपत्य करण्याखेरीज दुसरे काही काम दादांस राहिले नाही. नंतर गाजुद्दिनाच्या सांगण्यावरून दादांनी लाहोरावर स्वारी केली.