पान:मराठ्यांच्या इतिहासाची साधनें.pdf/254

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

१२९ पुण्यप्रताप तीर्थरूप नानासाहेबांचा आमचे मस्तकी आहे. तरी आतां अबदालीस मारतों. तूं फार जहालें तरी तिकडे जाशील. तेहि कबूल. परंतु हे गोष्टी कबूल करीत नाही. तेव्हां आठ दिवस दम धरून पाहिले. चहूंकडून इलाज केले. परंतु मी एकच जाब दिल्हा की आतां नशिबावरी बेतली. आतां दत्तबा नसतां मी कबूल करणार नाही. दत्तबा असता तरी सांगतो. त्याजवर रागैहि भरतो. परंतु पाठीमागे हे कबूल न करूं. तेव्हां आठा दिवसांनी वकिलांनी कबूल केले की आमचा व दत्तबाचा सलूख तुह्मीं मध्ये पडून करून द्यावा, आझी चाकरी करितों. तेव्हां वख्तावर नजर देऊन गोष्टी कबूल केली व वकिलास पाठविलें. तो जाऊन त्याचे कारभारी घेऊन आला. याशी बोललों झणजे बिजेसिंगहि येईल. याप्रमाणे वर्तमान कच्चे स्वामीस दखलगिरी असावी ह्मणोन लिहिले असे. दोनदा कागद वाचावा. हे विज्ञापना. पै॥ छ २० सवाल. [६] ॥श्रीशंकर ॥ १९ जून १७५७. सेवेसी विज्ञापना. अबदाली दिल्लीहून माघारा गेला. तेव्हांच आह्मी १५२ हे वाक्य दादांच्या नित्यांतल्या बोलण्यांपैकी आहे. काव्येतिहाससंग्रहातील पत्रे व यादी (३३) त “ यवनाची फौज बुडावतों" असें ह्याच मासल्याचे वाक्य आहे. हे सबंद पत्र व विशेषतः शेवटले अर्ध दादांच्या भोळ्या, तापट, विश्वासू , संतापी, माथेफिरू व एका प्रकारे लुच्या स्वभावाचें उत्तम दर्शक आहे. दत्ताजीच्या विरुद्ध आपण कालत्रयाहि जाणार नाही हे नानासाहेबांना पकें कळावे व त्यांच्या द्वारा पत्राने किंवा समक्ष दत्ताजीस कळावे हा हे पत्र लिहिण्याचा व तें दोनदा वाचण्यास सांगण्याचा मुख्य हेतु आहे. १५३ ह्या पत्रावरून अबदाली दिल्लीहून माघारी १९ जून १७५७ च्या पूर्वी बरेच दिवस गेला होता असे दिसते. १६ फेब्रुवारी १७५७ च्या अगोदर त्याला थोडे दिवस दिल्लीस येऊन झाले होते (लेखांक ५२ ), मथुरा, वृंदावन, आग्रा, ही शहरें लुटल्यावर