पान:मराठ्यांच्या इतिहासाची साधनें.pdf/253

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

१२८ करावी, चाकरी बराबर करावी. लाहोर, मुलतान, दिल्ली, आगरे, प्रयाग, जेथपर्यंत न्याल तेथपर्यंत जाऊन चाकरी करून दाखवावी. परंतु रामसिंगास राज्य देऊ नये. ऐसा भाव आहे. आह्मांस कारभारी आले आहेत त्याचे जबानी सांगोन पाठविले आहे की जे तुह्मीं सांगाल त्यास आझी कबूल. बलकी, एखाद्यास राज्य देववाल तरी देऊ. ऐसें सांगोन पाठविले आहे. परंतु आमों राज्य देवविल्याने कोठे देतील ! परंतु तोडमोड सांगू ते ऐकतीलसें दिसतें. राजश्री दत्ताजी शिंदे येतील त्यांसहि आपण सांगावें; हाणजे दोघांचा सलुख करून देऊ. जर दत्तबांनी ओढिले तरी आमचा इलाज नाही; परंतु ओढिल्यास परिणाम उत्तम नाहीं. फिरोन खर्चाखालीच येतील व मामलताह होणार नाही. ऐसे दिसते. यामध्ये आपली मर्जी कशी ते ल्याहावी. आह्मीं तरी बिजेसिंगासी कबूल केले की तुमचे तर्फेनें दत्तबास सांगू व दत्तवाचे तर्फेनें तुह्मांस सांगं . तुझी दोघांनीहि ऐकावें. ते त्यांनी मान्य केले. तुर्त आहीं मोघमच ठेविलें आहे व चाकरीस बलावितों. बहुधा येतीलसें दिसते. जेव्हां अबदाली ये प्रांतीं होता तेव्हां आमचे देखील सारे मुत्सदी ह्मणत होते की तुह्मीं बिजेंसिंगाचे मुद्दे कबूल करून बलावा ह्मणजे तुमचे राज्य राहील. नाही तरी, आतां गोष्टी भारी पडली. तेव्हां बिजेसिंगाचे मुद्दे हे होते की मी एक खेडें रामसिंगास देणार नाही. अबदालीशी लढाईची चाकरी मात्र करीन. मामलत रुपयाची सोडावी. फार तरी पांच चार लक्ष देईन. हे गोष्टी जर दत्तबांनी कॅबेल केली नाही, तरी तुझी व मल्हारबांनी माझे सोबती व्हावें ऐसें बोलत होते. ते आमचे सारे मुत्सदी कबूल करावें म्हणत होते व मल्हारबाचाहि भाव होता. मी साफ सांगितले की तुझा मुजाका आह्मी बाळगीत नाही. शिंद्यापेक्षां तूं आह्मांस अधिक नाही. फार जाहालें तरी आमांबरोबर येणार नाहीस. तरी तुजवांचून काय तटले आहे ? आमचे नशीबी असेल ते होईल. १. १५१ जयाप्पाप्रमाणेच दत्ताजीचा व जनकोजीचा मल्हारराव द्वेष करीत असे व शिंद्याच्या . शवला साहाय्य करण्याची त्याला शरम वाटत नसे असें जें बखरीत लिहिले आहे ते खरे आहे.