पान:मराठ्यांच्या इतिहासाची साधनें.pdf/252

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

१२७ ळाले करून पाठविलेत. कळले पाहिजे. आपणास पत्राचा जवाब शहानवाजखानांनी लिहिला तो मुनशापासून गुना जाला. मागून दुसरा तयार करून पाठवितों. हे विनंति. श्रीशंकर. १९ जून १७५७. सेवेसी विज्ञापना. विजेसिंगोंकडील मातबर कारभारी सांप्रत येथे आले. सांप्रत बिजेसिंगाचा भाव असा आहे की शिंद्याशी व आपल्याशी सलोख करून घ्यावा. आह्मीं सांगं तें बिनेसिंग ऐकणार व दत्तबांनी हि ऐकावें. लटका कजिया कशास करावा ? याखेरीज रुपयाची मामलत थोडीबहुत १५० ह्यावरून असे दिसते की विजसिंग व रामसिंग ह्यांच्यातील राज्याची कायमची वाटणी अद्यापपर्यंत ह्मणजे १९ जून १७५७ पर्यंत झाली नव्हती. श्रीमंत सावनूरच्या मोहिमेस जाण्यापूर्वी झणजे १७५५ आगष्ट-सप्टेंबरच्या पूर्वी विजेसिंग व रामसिंग ह्यांची निमेनिम वांटणी झाली ह्मणून भाऊसाहेबांची बखर पृष्ठ २०।२१ त लिहिले आहे; परंतु, ती वांटणी पुढें बिजेसिंगाने मोडली असे दिसते. कारण अबदाली गेल्यावर ह्मणजे १७५७ नंतर बिजसिंग रामसिंगास एक खेडेंहि देण्यास तयार नव्हता. दत्ताजी ह्या वेळी ह्मणजे १९ जून १७५७ त दक्षणेत होता; तो आल्यानंतर त्याच्या सल्ल्याने रामसिंग व विजेसिंग यांची पुन्हा बांटणी झाली असावी. भाऊसाहेबांच्या वखरांत नानासाहेबांनी दत्ताजीचें सांत्वन सावनुरच्या मोहिमेच्या अगोदर केलें आहे ह्मणून मटले आहे; परंतु ते बराबर नाही. कारण, १७५५ च्या जूनांत किंवा जुलैत जयाप्पा मारले गेले. नंतर चार सहा महिने वेढा चालून अंताजीमाणकेश्वराच्या हस्ते विजेसिंगाचा व दत्ताजीचा तह झाला ( पत्रे व यादी ४५१). नंतर उज्जनीस येऊन व बुंदीच्या राणीला सहाय्य करून शिंदे चांभारगोंद्यास आले ( भाऊसाहेबांची बखर, २०१२१). ह्या इतक्या गोष्टी करून शिंद्यास चांभारगोंद्यास येप्यास १७५५ साल सवंद संपावें असा अदमास आहे. सावनूरची स्वारी १७५६ च्या मेंत संपली त्यानंतर किंवा त्या सुमारास दत्ताजीची व नानासाहेबाची भेट झाली असावी. सावनूरच्या स्वारीच्या अगोदर दत्ताजीचें सात्वन करणे अशक्य होतें. दत्ताजीचें सांत्वन पेशव्यांच्या हातून होणें सावनूरची मोहिम संपता संपताच शक्य होते.