पान:मराठ्यांच्या इतिहासाची साधनें.pdf/251

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

॥ श्री॥ पु॥ तीर्थस्वरूप राजश्री राजे जीवनराव स्वामी वडिलाचे सेवेसी: विनंति. त॥ माजूर येथील निशापातीचा मजकूर दोन तीन पत्रीं लिहिला होता त्याप्रमाणे नवाब समसामुद्दौलाबहादर यांसी निवेदन केला. व त्याणी आज्ञा केली त्याप्रमाणे आपणास लिहिलेच आहे. पाहून अर्थ ध्यानास आलाच असेल. सांप्रत नवाबसाहेबांनी फिरोन आज्ञा केली जे मृगसाल अखेर जालें. अद्याप पैसे येत नाहीत. जागीर नवावाचे धाकटे भाऊ मीरमोगल यांची आहे. ते आपले पैशाकरितां आखड ह्मणतात. यास्तव त्याचे आज्ञेप्रमाणे लिहिले जाते की तेथील ताहुदापैकी सर्व हप्तबंदी आपण लिहून पाठविली त्याप्रमाणे वायदेहि आकार जाले. तरी पैसे ताहुदाचे झाडियानसी हुंडी करून पाठविले पाहिजेत व मुतसदी यांचा खर्चहि तीर्थस्वरूप पंतांनी ठहरविला होता त्याप्रमाणे मुतसदी यांचाहि ऐवज पाठविला पाहिजे. ज्या गोष्टीने येथे आझास बोलावयासी उजागिरी राहे तो अर्थ केला पाहिजे. सारांश कुल पैसे लौकर पाठवावे. हे विनंति.. 1 राजश्री शानजीपंत दि॥ शहानवाजखान याची जागीर मौजे गोसेगांव प॥ अंतुर आहे. अशास, म||रनिलेचे जागिरीचा अंमल नवाब समसामजंगाचे जागिरीप्रमाणे घेत जाणे. ऐसें आज्ञापत्र श्रीमंताचे राजश्री नारोबा बाजी याचे नांवे हसल होत असले तरी प्रयत्न करून पाठविले पाहिजे. हे विनंति. राजश्री अवधूतरावबावा येथे गंगाजान्हवी मातुश्री बयाबाईचे भेटीस जेष्ठ शुद्ध एकादशीस आलेत. मजलाहि दर्शनाचा लाभ घडला. दोन चार दिवस राहून नवाब समसामजंगाची भेटी घेऊन रुखसत होऊन जातील. कळावें हाणोन लिहिले असे. हे विनंति. ॥ छ १४ रमजान, बुधवार. कांही आज्ञापत्रे चिरंजीव रा॥ नारायणरायाचे नांवची होती व कांही माझे नांवें होती. त्यास त्याचे नांवें होती त्याचे जवाब त्याचेच नांवें लिहून पाठविलेत. माझें नांवें होती त्यांतील मजकुराचे जवाब मी विनंतिपत्री लिहिला. ते येका जागा पुरवणिया पत्रांच्या मिळतील, यास्तव लाखोटे वेग