पान:मराठ्यांच्या इतिहासाची साधनें.pdf/250

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

१२५ सात बंद विस्तारे लिहिले त्याचे हर जबाब कुल चिरंजीव राजश्री नारायणराव आपाजी याचे नांवे सादर जाले व माझे नाव दोन वेळां दोन आज्ञापत्र मुत्खसर सादर जालींत. आशास सांप्रत त्यांची उत्तरें येथून विनंतिपत्र पाठविली असत त्याजवरून कळों येईल. घराऊ कामकाजाचा मजकूर लिहिला त्यासी तीर्थस्वरूप पंताचे दस्तकिती व यादी मजला ठाऊक नाहीं. व दस्तकींत यादीहि नाही. नवाब समसामुद्दोलासी अलीकडे पंतांनी कांहीं मजकूरहि नवा केला नाही. रा॥ मुरारपंतनाना यांशी कागद आहेत ते मजलाहि कळलेच आहेत. वडाळे व पिंपळगांवचे वगैरे आहेत. त्याच्या सनदा लवकरच तयार करवितो. वडील आपले ताल्याने राजे जालेत. न्याचे ताले शिंकंदर त्याचे मनोरथ श्री पुरवीतच आहे. नवाब समसामुद्दोलास अर्जी पाठविली ते गुजराणून जबाब हसल करून पाठविला असे. इतक्यावर वडीलाचे पत्र त्यास हिंद्वीच येत जावें. चिंता नाही. येथून जबाब फारशी होत जाईल. रा॥ वेंकाजी हरी यासी खंडाळें खानापूर येथील काम करून दिल्हे. तीन चार हजार रुपये पेशगी द्यावी लागते. त्याचा सरंजाम दोचो दिवसांत होणार ह्मणजे खलत व सनद देऊन मार्गस्त केले जाईल. रा॥ मालोजी राजे घोरपडे यांचे कार्याविशीं फारसे लिहिले. अशास येथील प्रसंग सांप्रत काळचा कळतच आहे.आह्मी "सई करावयास चुकत नाही. रा॥ धोंडो आकदेव याचे पत्राचा जबाब व तीर्थस्वरूप पंताचे लिहिल्या॥ नांवें सनद पाठवून देऊ ह्मणोन लिहिले ते कळले. कासदास इनामवायदा चुकला तरी देणे ह्मणोन लिहिले. अशास, त्याचा वायदा तरी बावीसावे शाबानी त्यांनी पावावें तें छ ? रमजानी पावले; परंतु वडिलांची आज्ञा प्रमाण यास्तव इनाम देऊनच मार्गस्त केलेत. श्रीमंत कृष्णा उतरल्यावर तुह्मास हुजूर बोलावणार ह्मणोन लिहिले. त्यासी उत्तम असे. आज्ञापत्र येतांच हजूर येतो; परंतु गंगाजान्हवी मातुश्री बयाबाईचा हेत जे चिरंजीव नारायणरायास घेऊन श्रीमंतांपाशी यावे. आपले वर्तमान विनंति करावी. पुढे ज्याद्॥ आज्ञा होईल त्या।। वर्तणूक करावी. तरी याचे उत्तर पाठविले पाहिजे. हे विनंति. ॥ छ १४ रमजान. पा प्रयत्न