पान:मराठ्यांच्या इतिहासाची साधनें.pdf/249

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

१२४ में काम श्रीमंताचें तें आमचें व आमचें तें श्रीमंताचें. जे काम पुणेस पडेल तें करावेंच ऐसी निष्ठा यांची श्रीमंताचे पायाशी आहे. सर्वस्वी श्रीमंताचाच झणवितों. हे विनंति. शाहनवाजखानांनी वडिलांचे नांव घेऊन ह्मणों लागले जे तुह्मीं त्यास लिहिणे जे श्रीमंतास आमचे तरफेने पुसावें जे साहेबास आमचा करार की नवाबांनी कृष्णापार न व्हावे व इकडं गंगापार न व्हावें. श्रीमंतांनीहि चार दिवस इकडे तिकडे कालक्रमणा करून कृष्णा न उतरतां पुण्यास जावें. याचा सबब अबदालीचीच आवई येऊन ठहरली होती ऐसें असतां बावजुद अबदालीची गडबड दिवसोंदिवस अधिक ऐकत असतां मुलूक आपला खाली टाकून श्रीरंगपट्टणास आपपश्चात् न विचारितां गेलेत. जगदीशकृपेनें अबदालीहि गेला आणि मोहीमहि सर जाली ह्मणोन उत्तम जालें. येखादी नेक बाद होय तरी कैसे ? श्रीमंत दादासाहेब व रा।। मल्हारजी बावा होळकर यांजपाशी फौज जमाव होत नाही. दहा पंधा पावतों फौज होती; परंतु त्याचीहि फौज मोठी लढाक होती. या फौजेनें अबदालीचे फौजेवर चालून जाणे तरी कळत आहे; परंतु ते दक्षणेस चाललेच येते तरी त्याच्याने कांहीं न होते. त्याचे फौजेचे तोंडावर न येवत ऐसें असतां श्रीरगपट्टणास जावयाचा कस्तम केला. हे सलाह काय जाणून केली होती हैं कळलं पाहिजे. तरी हे श्रीमंतांस विदित करून उत्तर याचे आले पाहिजे. हे विनंति. वडीलपणे मजला कितेक बुद्धिवाद लिहिला व सर्फराजीची अक्षरें लिहिली त्याजवरून फारच संतोष जाहला. बुद्धि शिकवणे व सर्फराज करणे हे वडिलांस उचितच असे. त्याप्रे॥ वडील करतील हा भरंसा आहे. विशेष काय लिहूं हे विनंति. माझे बुद्धी॥ मी सरकारचे काम करीतच आहे. हे विनंति. तीर्थस्वरूप पंत जिवंत असतां छ २४ जमादिलाखरी हुजुर विनंतिपत्रे १४९ शहानवाजखान पेशव्यांचा किती अंकित झाला हे ह्या प्यान्यात त्याने दाखविलेल्या काळजीवरून स्पष्ट आहे.