पान:मराठ्यांच्या इतिहासाची साधनें.pdf/24

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

डिसेंबरांत व १७५७ च्या जानेवारी-जुनांत विश्वासराव व दत्ताजी ह्यांनी सलाबतजं. गावर (२९) स्वारी केली. १७५७ च्या जुलैंत बाळाजी पुण्यास आले व नंतर सप्टंबरांत त्यांनी निजामावर स्वारी करून विश्वासरावाच्या हातून सलाबताचा शिंदखेडास (३० ) पराभव करविला. १७५७ त रघुनाथरावांनी गुजराथेतून हिंदुस्थानांत (३१) स्वारी केली. १७५८ त रघुनाथरावांनी लाहोरास ( ३२ ) स्वारी केली. बाळाजी बाजीराव व विश्वासराव ह्यांनी निजामावर ( ३३ ) टेहळणी केली व जानोजी भोंसल्याला वठणीस आणिलें. १७५९ त गोपाळराव पटवर्धनाने श्रीरंगपट्टणावर ( ३४) स्वारी केली. दत्ताजीनें रोहिलखंड व लाहोर या प्रदेशावर (३५) स्वारी केली आणि मानाजी व राघोजी आंग्रे यांणी कांसे, उंदेरी इत्यादि शामळाच्या स्थलांवर (३६) चाल केली. १७६० त भाऊंची उदगीरची ( ३७ ) मोहीम झाली. दत्ताजीचे अबदालीशी ( ३८ ) युद्ध झाले. मल्हाररावाचें अबदालीशी (३९) युद्ध झाले व पानिपतची (४०) मोहीम झाली. १७६१ त पानिपतची शेपटें. (१) जानोजी भोंसले, गोपाळराव पटवर्धन, रघुनाथराव, विसाजी कृष्ण, बाळाजी गोविंद इत्यादींनी मराठ्यांची उद्वस्त झालेली सत्ता स्थापण्यास केलेले प्रयत्न. ( ४२ ) कोळ्यांची कोळवणांत बंडे, येणेंप्रमाणे एकंदर बेचाळीस मोहिमांचे उल्लेख, काव्येतिहास संग्रहांतील पत्रांतून, ऐतिहासीक संग्रहांतील पत्रांतून व मी सध्यां छापिलेल्या पत्रांतून सांपडतात. ह्याखेरीज आणखी काही मोहिमा १७५० पासून १७६१ पर्यंत झाल्या नाहीत असें मात्र कोणी समजू नये. गुजराथेंत दमाजी गायकवाड, दिल्लीस अंताजी माणकेश्वर, बुंदेलखंडांत गोविंदपंत बुंदेले, अंतर्वेदीत गोपाळराव गणेश, गणेश सभाजी व गोपाळराव वापूजी इत्यादि मंडळी ह्या अकरा वर्षांत काय करीत होती ह्याचा बिलकूल पत्ता नाही. तसेंच जानोजी भोंसले, रघूजी करांडे, विसाजी कृष्ण बिनिवाले, मुरारराव घोरपडे, कोल्हापुरकर इत्यादि दक्षिणेतील सरदार नक्की काय करीत होते ह्याचाही बहतेक बिलकुल पत्ता नाही. मराठ्यांच्या इतिहासाचे सध्यां मुख्य भांडार मटले ह्मणजे ग्रांट डफ्चा इतिहास होय. ह्या इतिहासांत ह्या सरदारांच्या कृत्यांचा वृत्तांत मुळीच दिलेला नाही; ह्यावरून ती कृत्ये क्षुल्लक होती असा ग्रह होण्याचा संभव आहे. परंतु तसा ग्रह होऊ देणे अगदी चुकीचे आहे. ग्रांट डपच्या ग्रंथांत ह्या दहा वर्षातील घडामोडींची, विस्तृत तर राहुंद्याच परंत, साधारण समाधानकारक अशी देर्खाल माहिती दिलेली नाही. त्याने लहान सहान मोहिमा तर सोडून दिल्या आहेतच; परंतु, काही मोठमोठ्या मोहिमा देखिल गाळिल्या आहेत. त्या त्याने मुद्दाम गाळल्या आहेत असा ह्मणण्याचा भाग नव्हे; तर मिळालेल्या कागदपत्रांचा योग्य उपयोग त्याच्या हातून झाला नाही. जे लेख त्याला मिळाले होते त्यांचे