पान:मराठ्यांच्या इतिहासाची साधनें.pdf/247

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

१२२ सरवून जाधवरायाच्या तंबीकरितां चाललो. ते वेळेस गिरमाजी खंडेरायापुरतें सामान पुष्कळ होते. त्या वेळेस गिरमाजी खंडेराव याने करसरमदार परशरामपंताचे मारफातीने केला जे आह्मी इतक्यावर गंगा उतरणार नाही. वराडांतच जातो. असे असतां आझांसच इलजाम श्रीमती दिल्हा हे काय ? आह्मी तरी त्यांचे आज्ञे॥ वर्तणूक केली. गिरमाजी खंडेरायाने करारमदार केले; परंतु आमी जाधवरायाचे तालुकियांत धसलों तों त्यांनी गंगा उतरून बेइमानी करून वरंगेल सरकार व येलगंदल सरकार व निर्मळ वगैरे कुलप्रांत धुळीस मेळविला. व इंदुराकडे फिरोन दुस-याने आले. परगणे खराब करीत बसवड वगैरे मुलुक हैदराबाद सुभ्याचा खराब करून पैसे मबलक घेतले. तसेंच वसकतेवरून घासदाणे घेत परदूर प॥ लक्ष्मणराव खंडागळे याचे जागिरीत धसले. औरंगाबादेसमीप आले होते. याप्रे॥ त्यांनी बदमामली केली. वराडांत मनमानले पैसे घेतले. राजश्री बाबूराव कोन्हेर यासी तह करावयासी पाठवणार होते त्यासी न पाठविले. जे जे करार श्रीमंतासी केले त्यांत येकहि अमलामधे याजकड़न आला हे परिच्छिन्न कळन चुकलेच आहे. छावणी आलजपुरची तरी होऊं सकत नाही. कां की फौजा कुल वाटे लाविल्या. जुने फौजेनशी जाणे सलाह नाही. चित्तांत आहे जे रमजान आंदर जालियावर ईद करून हैदराबादेस यावें. तिकडे गेल्या वेगळे हुजूरचे फौजेस खर्चास मिळणे कठीण होईल. जरी पाण्याने उघाड दिधली तरी हैदराबादेस जावें. नाही तरी औरंगाबादचीच छावणी जाली. छावणी औरंगाबादेस हो अथवा हैदराबादेस हो, परंतु दसरा जाल्यावर परिच्छिन्न रा) जानोजी भोसले यांसीं समजोन घेणे जरूर. त्याचे पारपत्य आवश्यक व चित्तानुरूप करावें व करितोंच; परंतु श्रीमंती मध्ये आणखी कांहीं न ह्मणावें. ज्याप्रे॥ सांप्रत लिहिले आहे याच गोष्टीवर कायम असावें. फिरंग्यास मागें बोलावू पाठविलेंच होतें व सांप्रतहि पत्र पाठविलेंच आहे जे तुह्मी लौकर येणे. पहिले पत्राचे उत्तर फिरं १४७ भोसल्याचा एक सरदार.