पान:मराठ्यांच्या इतिहासाची साधनें.pdf/246

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

१२१ पाहतां नये. आह्मी समीप आहों. आझांसहि भोसल्याची कुमक करावी लागेल. जेव्हां श्रीमंताची लिहिली ऐशी पावली मग पुढे कसे जावें ?यास्तव श्रीमंतांचे आज्ञेपें॥ गंगातीरपरियंत जाऊन गिरमाजी खंडेराव यासी मागे संस्कृत [१] शातवाहनकुले कृष्णे राजनि नासिककेन [ २ ] श्रमणेन महामात्येन लयन कारित मराठी शातवाहनकुलांतील कृष्णराजा राज्य करीत असतां नाशिक येथील श्रमण महामात्याने हे लेणे बांधिलें. हा कृष्णशातवाहन ख्रिस्तापूर्वी ११० व्या वर्षी हयात होता. ह्यावरून 'कन्ह' हा शब्द दोन हजार वर्षांचा जुना आहे हे सिद्ध आहे. हा शब्द पुढे कन्हर या रूपाने दृष्टोत्पत्तीस येतो. देवगिरी येथील ज्ञानेश्वराने नावांजलेल्या रामदेवराव जाधवाच्या बापाचें नांव कन्हरदेव किंवा कृष्णदेव असे होते. हा कन्हरदेव इ. स. १२४६ त गादीवर बसला. पुढे ह्या कन्हर शब्दाची कान्हेर, कोन्हेर इत्यादि रूपे झाली. येणेप्रमाणे कन्ह, कन्हराज, कन्हर, ह्या परंपरेनें कोन्हेर हा शब्द कन्ह शब्दापासून निघाला आहे व तद्वाचक कृष्ण हा शब्द संस्कृतांत आहे. आतां संस्कृत कृष्ण शब्द अगोदरचा किंवा महाराष्ट्री कन्ह शब्द अगोदरचा? 'मराठ्यांच्या संबंधाने चार उद्गार' काढणाऱ्या वे. शा. सं. राजारामशास्त्री कार्लेकर यांच्या मताप्रमाणे “ अतिप्राचीन मन्हाठी" "मानवी संस्कृता" च्या प्राकालीन धरली तर कन्ह व कृष्ण ह्या दोन्ही शब्दांचें मूळस्वरूप "अतिप्राचीन महाठी"व"मानवी संस्कृत" ह्या दोन भाषांची जी उगमदात्री भाषा असेल त्या भाषेत सापडावें. "मानवी संस्कृताचे” “आर्ष संस्कृत" मूळस्वरूप; परंतु, “ अतिप्राचीन महाठी" चे काहीं " आर्ष संस्कृत” मूळस्वरूप नव्हें. तेव्हां “आर्ष संस्कृताच्या" कालाच्या पलीकडे ह्या महाठी कन्ह शब्दाचे मूळ शोधीत गेलें पाहिजे. कन्ह हे विशेषनाम यरोपियन लोकांत आहे. त्याची Cuhne अशी मांडणी करतात. तेव्हां यूरोपांतील Cuhne व अतिप्राचीन म-हाठी कन्ह हे शब्द समस्वरूपी दिसतात, त्याअर्थों आपणां मराठ्यांचे पर्वज व युरोपांतील 'अर्य' शाखेचे पूर्वज जेव्हां एका ठिकाणी होते त्यावेळी Cuhne, कन्ह, हे नांव प्रचारांत होते असे दिसते. अर्थात 'कन्ह' हा शब्द प्राचीन किंवा अर्वाचीन संस्कृतापासून निघालेला नाही. हा शब्द शुद्ध प्राकृत मराठी आहे. कित्येकांच्या मते हा शब्द मुळांत कानडी किंवा द्राविडी असावा. परंतु हा शब्द शुद्ध मराठी आहे हे जर निर्विवाद सिद्ध करतां येत आहे, तर तो कानडी आहे एवढे नुसतें वोलण्यांत कांहीं मतलब नाही. द्रविडांपासून मराठ्यांनी हा शब्द घेतला असें स्पष्ट दाखवून दिले पाहिजे.