पान:मराठ्यांच्या इतिहासाची साधनें.pdf/245

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

१२० दांचे एक काम वराडचे करून द्यावें; यांतच उत्तम. उभयतां निंबाळकरांपाशी दहा हजार फौज प्रतिवरशी असावी. येक साल घरांतीलच ऐवज खावं. दाच्याच मुलकांत मेळविला. त्यापैकी खर्च करून फौज ठेवावी. आणि काम करावें. तरीच खावंदाने मातबरीने बाळगिल्याचे फळ व निंबाळकराचे सेवकध सि उचित असे. सदरहू मजकूर येकांती नवाब समसामुद्दौला बहादर यांसीं येक येक अक्षर वाचून दाखवून सदरहू। करवून वराडांत नवाबाचा अंमल सुरळित होय, गोवळचा किल्ला घेऊन चाकर मातबर निंबाळकर यांची आजमायेश होय तें करणे ह्मणोन लिहिले. आशास याचे उत्तर केले जे श्रीमंताचा आमचा स्नेह. तेव्हां जें करणें तें आझांस श्रीमंताचेच विचार केले पाहिजे.जे वेळेस आह्मी भागानगरीहून निघालों आणि वराडांत जायाचा कस्त केला त्या दिवसांत श्रीमंताची पत्रे पावली जे गंगातीर परियंत जाऊन दबाव घालावा. गंगापार न व्हावें. दबावानेच किल्याचे काम करून घ्यावे. पाबाबूराव कोन्हेर येतील. तह जाल्यावर तहा॥ वर्तावें. गंगापार होऊन गेले तरी आह्मांस तमाशा १४५ येथपर्यंत पेशव्यांचा सवाल झाला. ह्यापुढें समसामजंगाचा जबाव सुरू होता. पहा जानोजी भोसल्याचा कारभारी. १४६ 'कोन्हेर' हे नांव ऐतिहासिकलेखसंग्रहकार आपल्या मासिकपुस्तकांतील नबर। च्या पत्राच्या टीपेंत ह्मणतात त्याप्रमाणे गेल्या शतकांत बरेंच प्रचारांत होते असे दिसते. बाबूराव कोन्हेर, कोन्हेर त्रिंबक एकबोटे, कोन्हेर त्रिंबक पटवर्धन, कान्होजी आंगरे, कान्होजी भोसले, कान्होजी गायकवाड, कान्होजी मोहिते, ही विशेषनामें मराठ्यांच्या इतिहासांत प्रसिद्ध आहेत. कान्हेरे, कोन्हेरे, कण्हेरे ही आडनांवेंहि कोंकणांत व देशावर ऐकण्यांत येतात. कोन्हेर, कान्होजी, कोन्हेरे, कान्हेरे, कन्हय्या, कान्हा, कान्हया, या शब्दांतील मूलप्रकृति 'कन्ह ' हा शब्द आहे. 'कन्ह' हा शब्द प्राचीन महाराष्ट्रांत 'कृष्ण' वाचक होता. हा शब्द निदान दोनएक हजार वर्षांचा जुना आहे हे खालील शिलालेखाच्या उताऱ्यावरून स्पष्ट आहे. हा उतारा नाशिक येथील लेण्यांतील नंबर १९ च्या लेण्याच्या उजव्या खिडकीवर असलेल्या २२ नंबरच्या लेखाचा आहे. उतारा येणे. प्रमाणे आहे. प्राकृत [१] सादवाहन कुले कन्हे राजनि नासिककेन [२] समणेन महामातेन लेण कारितं