पान:मराठ्यांच्या इतिहासाची साधनें.pdf/244

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

फौज, सरदार, मराठे व फिरंगी कोणी नवते. तंबी पोहचून सदरहू। अंमलांत यावें तें न जालें. नवाब फिरले. जाधवरायाच्या मुलकाच्या बंदोबस्तास गुंतले. असो. हे साल गेले. परंतु, पुढे आतापासूनच माहाराव जानोजी निंबाळकर व हणवंतराव निंबाळकर यांसी सांगावें की दोवेजण एकेविचारें वराडांत जाऊन भोसल्यास तंबी करून सदई कामें सरकारची करणे. उभयतां निंबाळकरास वसूल पन्नासा लाखांचा मुलक आहे. व भोसल्यासहि पन्नासा लाखांचा मुलूक आहे. हे ह्मणतील की त्याजपासी फौज फार. तरी सरकारच्या कामावरी येक वरीश आणखी पांच पांच हजार फौज ठेविली तरी काम होईल. पैका कोठे ह्मणतील तरी येक येक वरीश उभयतां निंबाळकर चाकरीस आले नाहींत. कदाचित् आले तरी जानोजीचा पुत्र सात आठशे, हणवंतराव दोन हजार. मुलुक आहे त्याने॥ फौज निरंतर पांच पांच हजार यांजपाशी असावी. दुसरे पांच पांच हजार फौज येक साली जाजती ठेवावी. खाविंदांचें काम करून द्यावे. तरीच जन्मपरिवंत मातबरीने मुलूक देऊन ठेविलियाचे फळ. नाही तरी इतका मुलूक खावंदाने त्याजवर कैसा बहाल ठेवावा. कितीदां चाकरीस नच आले. पैसा वसूल जाला तो खजाना मागे पडला त्यापैकीच खर्च करून जाजती पांच पांच हजार फौज ठेवावी. आणि खाविंजून इत्यादि महिन्यांत झाला असला पाहिजे. पुढे सर्वात ह्मणजे १७५६ च्या सप्टंबरअक्टोबरांत निजामाने भोसल्यावर चाल केली व तो विन्मुख होऊन परत आला तो सवा साल संपलें; ह्मणजे १७५७ चा जून महिना आला व समान सालाला प्रारंभ झाला व हे पत्र लिहिले गेले. आतां हे नवीन साल लागले तेव्हां निजामानें जानोजी भोसल्याला खरपूस चोप द्यावा असा पेशवे समसामजंगास उपदेश करितात. हा चोप जानोजी व हणवंतराव निंबाळकर यांच्या करवी द्यावा असें पेशव्यांचे मत होते. परंतु दोघे निंबाळकर निजामाविरूद्ध नुकतेच उठले होते, तेव्हां ते ह्या खटाटोपांत पडणार नाहीत हेहि ते जाणून होते. तत्रापि निजामाचे पुरातन सेवक ह्या नात्याने ते नाही ह्मणून स्पष्ट ह्मणणार नाहीत ह्या समजुतीने पेशवे हा उपदेश निजामास करीत आहेत. शिवाय हे दोन सरदार भोसल्यावर गेले ह्मणजे निराश्रित झालेल्या निजामावर पेशव्यांना स्वारी निवैधपण करता आली असती हें नानासाहेबाचें अंतस्थ धोरण होते. पुढे १७५७ च्या आगष्टसप्टंबरांत पेशव्यांनी जी निजामावर स्वारी केली त्याची प्रस्तावना ही जून महिन्यांत चाललेली आपण ह्या पत्रांत वाचीत आहों.