पान:मराठ्यांच्या इतिहासाची साधनें.pdf/243

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

११८ ऐसे महाल कोठे आहेत ? त्या माहालास कौल श्रीमंताचा जार. यावरी तनखाहि कदाचित् वसूल होऊं सकेल; परंतु आजच पाहिल्यास नाही. जो येक निश्चय झाला आहे त्याचा परस्परें निर्वाह करावा यांत उत्तम आहे हे विनंति. राजश्री जाधवरायास चार पांच महिने कैदेतच ठेवावें, तदनंतर श्रीमंत स्वामीच्या विद्यमाने में करणें तें करावें. ऐसें समसामजंगास सांगावे ह्मणोन लिहिलें.3 अशास, जाधवरायास पहिलेच रुखसत केलें. वर्तमानहि हुजूर लिहिलेच आहे. आता त्याच्याने काय होते ? केवळ निर्जीव करून सोडिलें. ज्या गोष्टीचे भयास्तव त्यास अटकाव करावा तें त्याच्याने कांहीं होवत नाही. कळले पाहिजे. हे विनंति. २॥ छ १३ रमजान. विनंति श्रीमंत प्रतापवरिष्ठाभिधान राजश्री पंतप्रधान स्वामींनी एकांती खिलवतांत फर्माविलें की जानोजी भोसले यांनी पुण्यांत असतां करार केला की किल्ला गोवळेचा नवाबाचा घ्यावा, वराडांत अंमल तह नासरजंगाचे वेळेस जैसा होता त्या॥ वती, गंगथडीस घासदाणा जाजती न घ्यावा, सुरळित सदई करारा। वर्तावें. ते तों एकहि गोष्ट अंमलांत न आली. बदमामली करून वराडांत पैका घेतला. गंगथडीस घासदाणा घेतला. मुलख पायमाल केला. उपरि नवाब खुद्द. बदौलत वंजरासंगम पावेतो गेले; परंतु, १४३ येथपर्यंत सवाल झाला. ह्याच्यापुढे जबावाला सुरुवात होईल. १४४ जानोजी भोसल्याने निजामाला इतकें सतावून केव्हां सोडले व निजामवंजरासंगमापर्यंत जाऊन हात हालवीत परत केव्हां आला तो काल नकी ठरविता येत नाही. कारण ग्रांटडफ भोसल्याच्या ह्या पराक्रमासंबंधी व निजामाच्या ह्या व्यर्थ प्रवासासंबधी काहीच सुगावा लागू देत नाही. तरी ह्या गोष्टींची तारीख ठरविणें अवश्य आहे. हे पत्र समानसालच्या १३ व १४ रमजानला रवाना केलें व अधल्या दिवशी ज्येष्ठ शुद्ध १३ ला लिहिले आहे. ह्मणजे सबा साल संपून समान सालाला आरंभ होऊन दुसऱ्या दिवशीच हे पत्र लिहिले आहे. ह्या पत्रांत पुढे हे साल गेले' ह्मणून ज्या सालासंबंधी उल्लेख केला आहे तें साल सवा होय. निजाम वंजरासंगमापर्यंत सबांत गेला. तेव्हां भोसल्याचा पराक्रम सबाच्या आरंभी व सीतच्या शेवटी केव्हां तरी झाला असला पाहिजे; ह्मणजे १७५६ च्या मार्च, एप्रिल, मे