पान:मराठ्यांच्या इतिहासाची साधनें.pdf/242

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

११७ निश्चय जाला. तीन हजार फौजेनिशी चाकरी करावी. जोवर जागीरीचा ऐवज आबाद होऊन खातरख्वा हातास ये तोपर्यंत जसा वसूल तशी दिडाहजारांनसीच चाकरी करावी. जेव्हां नीट आबादी होऊन वसूल चांगला येऊ लागेल तेव्हां करारा॥ ती हजारांनसी करावी. अथवा एखादें काम जरूरी पडेल तेव्हां तिन हजारांनसीच करावी ऐसा निश्चय ठहरून चुकला. महाल मोकरर जाले. त्या॥ आमी आपल्या करारावर कायम आहों. आतां घडी घडी असें कराल तरी कसे होईल ? गुंजोटी वगैरे परगणे येथील जप्तीच्या मात्र सनदा रा॥ धोंडो आकदेव यांचे नांवें दिल्ह्यात तेथे अमल त्यांचा जाला. वरकड परगणे रदबदलींत टाकिलेत. अशास परशुरामपंतांनी केलें तें श्रीमती मान्य करून दसरा होतांच हजार दीड हजार फौज चाकरीस पाठवावी. हणजे सनदा करून देऊ त्याजवरून अंमल करावा. वराडचे माहाल जबन ? ह्मणतात त्याच माहालावर लक्ष्मणराव खंडागळे आडचा तीहजारा फौजेनसी हमेशा चाकरी करीत होते व रघोजी भोसल्यास बार येत होते. रघोजी बोवाचे प्रस्थ भारी जाल्यावर माहाल त्यांनी खराब केले. श्रीमंताचे महाल जाल्यावर रा जानोजी भोसल्याची ताकद नाहीं जे तिकडे पाहे. मग कोण्हाचेहि भय तिकडे नाहींच. तालुका एका दो वर्षांत आबाद होऊन पैसे चित्तानरूप येतील. सांपतचा वसूल . येथे कसा कळतो ? केवळ वैराण नाहीत. जून आबादी आहे. तनखा वसूल तह झाल्याचेंहि ग्रांटडफ् लिहीत नाही. मग परशुरामपंतानें ही बारा लाखांचा जहागीर ठरविली ती केव्हां व काय ह्मणून ? १७५३ पासून १७५७ पर्यंतचा आणीक कांहीं निजामासंबंधी पत्रव्यवहार सांपडल्यावांचून ह्या प्रश्नांचे उत्तर देणे अशक्य आहे. १७५० पासून १७६१ पर्यंत ग्रांटडपच्या ग्रंथात माहिती वरवर दिलेली असते. ह्या दहा वर्षांतील लढायांची कारणे, लढायांची वर्णने, तहांची मुद्देसूद कलमें, पेशव्यांच्या सरदारांचे पेशव्यांशी कालभेदाने झालेले बुद्धिभेद, पेशवे व सरदार ह्यांचे परस्पर स्नेहसंबंध, दरवारांतील दुफळ्या, सखारामबापू, दादासाहेब, भाऊसाहेब, नानापुरंदरे, बाबूराव फडणीस वगैरे पुरुषांचे स्वभाव इत्यादि अनेक गोष्टी ग्रांटडफ्नै अजीबात गाळल्या आहेत. ह्या गोष्टींचे होईल तितकें दिग्दर्शन प्रस्तावनेत केले आहे.