पान:मराठ्यांच्या इतिहासाची साधनें.pdf/241

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

११६ मदार जाला असतां, वर्षास विजापूर सुभ्यांतील ठाणीटुणीं गांव घेतच असतात. यंदा आलमले वगैरे व तालीकोट परगण्यांतील मुद्देबिहाळ वगैरे व आणखी कितीक ठाणी घेतली. त्यामध्ये मुलकांत बदनुका दिसोन येते. जे हे ह्मणतात, श्रीमंताचा आमचा स्नेह आणि करारमदार जालेत आणि श्रीमंत वर्षास गांव ठाणी घेतच असतात. आह्मांस तव कोहे" जे श्रीमंताची फौज हमेशा त्या सुभ्यांत फिरती. कोण्ही आमच्या ठाण्याठण्यास उपद्रव देईल त्यास तंबी करून ठाणी आमचे तालुकदाराचे स्वाधीन करावी तें एकीकडेच राहिले. आपण ठाणी घालितात. शिन्यासाठी आह्मांस मुरारराव याचे व पाळेगारांचे भय दाखवून लिहितात जे ते टपले आहेत, घेतील. श्रीमंती मुराररायास व पाळेगारांस ताकीद उत्तम प्रकारे केलिया त्यांची काय ताकद आहे जे वाकडी गोष्ट सांगू पहातील ? ज्याने वाकडी गोष्ट सांगितली त्यास शिक्षा करणे काय कठिण आहे ? फौजच त्या प्रांती ठेवणे तरी बहुत ठाणी मातबर त्या जिल्ह्यांत आहेत. ज्या ठाण्यांत सरदार राहील तेच ठाणे मातबर. सरदारास आज्ञा व्हावी जे नवाबाकडील दिलावरखां शिन्यांत आहेत त्याची कुमक मदत करीत नाहीं तें न करतां* आह्मांस लोकांचे भय दाखवून आपणं शिर घेऊं ह्मणतात. तेव्हां करारमदार नवाबाचा श्रीमंताचा लोकांस कसा खरा भासेल व करारमदार कोठे राहिला ? त्या प्रांतांत आमची तेवढीच जागा नांवास मात्र राहिली आहे ते घेतल्यास लाचार ! पंधरा लाखांची जागीर ध्यावयाचा करार. पैकी बारा परशरामपंती करार करून यादी पाठविली. बाकीचे ऐवजांत शिरे घ्यावे ह्मणोन लिहिले. त्यास पंधरा लाखाची परशरामपंत मागत होते. शेवटी बारा लाखांची द्यावी हा १४१ तर सांगतात. उलटें. १४२. १७५२ च्या सप्टेंबरांत गाजुद्दिन वारल्यावर, सलावतजंगाशी पेशव्यांचा तह झाला. त्यात तापीपासून गोदावरीपर्यंतचा पश्चिमेकडाल मुलुख पेशव्यांस मिळाला. त्यापुढे १७५७ च्या आगष्ट-सप्टेंबरपर्यंत निजामाची व पेशव्यांची कोठे लढाई झालेली ग्रांटडच्या ग्रंथांत सांपडत नाही. तसेंच निजाम व पेशवे यांच्यामध्ये नवीन एखादा