पान:मराठ्यांच्या इतिहासाची साधनें.pdf/240

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

११५ पोटास व शिबंदीसच बेजार झाले. त्यांस एखादं ठिकाण रहावयास देऊन सरकारची फौज शिन्यांत ठेवावी; मातबर सरदार ठेवावा. सरकारांत पंधरा लाखाची जागीर परशरामपंत जिवंत असतांच समसामजंगांनी करार केला. त्यास बारा लाखाची जागीर गुंजोटी वगैरे व बालाघाट, हरदापुर व व-हाडांत महाल नेमून यादी लिहिली. ते चौकशी व वसूल तुहीं लिहून पाठविल्यावर सेरहसल असल्यास घेतली जाईल. बाकींत शिरें घ्यावे. ह्मणोन विस्तारें परशरामपंत जिवंत असतां हुजरची आज्ञापत्रे खासदसखत व माझी पत्रं आज्ञेप्रे॥ | जाली. सबब जे लष्कर दूर; शि-याचा जबाब येईल तोवर येथे राहणे कसे होते ? बद्दल जातां मार्गे फौजेसहित मातबर सरदार ठवितील; शिरे घ्यावयास मुरारराव वगैरे टपलेच आहेत; यास्तव ठाणी राग्वावयासी, सरदार रहावयास, जागा उपयोगी पडेल; जाग्यांत ऐवजवसुली कांहींच नाही व ठिकाणहि मातवर नाही; परंतु, आब हवा मात्र काहींसी बरी व या प्रांताच्या ठाण्यास जवळ, यास्तव घेणे जरूर आले. ह्मणोन लिहिले. अशास समसामद्दौला हाणों लागले जे श्रीमंताचा आमचा करार १३९ जीवनरावाच्या पूर्वीचा पेशव्यांचा निजामच्या दरवारी गुप्त खटपटी करणारा मुत्सदी. १४० शिरें पेशव्यांनी कां घेतले त्याचें हें सबळ कारण आहे. निजामाच्या दक्षिणेकडील मुलखाचा बंदोबस्त करण्यास शिऱ्याचे ठाणे उत्तम होतें. पेशव्यांनाहि कर्नाटकांतील मुलूख राखण्यास शिरें जरूर हवें होतें. श्रीरंगपट्टणावरती पेशव्यांनी ज्याअर्थी नुकतीच स्वारी केली होती त्याअर्थो शिऱ्यावर निजामापेक्षा पेशव्यांचा हक जास्त होता. १७५० त नासीरजंगाने दक्षिणकर्नाटकांत स्वारी केली त्यापलीकडे १७५७ पर्यंत निजामाने श्रीरंगपट्टणाकडे कधी वळून पाहिले देखील नाही. आतां पेशवे शिन्यांत ठाणे वसवितात असें पाहून निजामाने दिलावरखान नामेंकरून कोणी लेचापेचा सरदार तिकडे ठेवून दिला; परंतु त्याची खुद्द विजापूर सुभ्यांत दाद लागेना ती शिांत कोठून लागणार ? इकडे पेशव्यांचे तर शिांत ठाणे बसले. तेव्हां कांहीं तरी कुरापत काढून बोलणे चालवावें या निमित्ताने समसामजंग, पेशव्यांनी अमूकं तालुके घेतले, मुराररावाने अशी बदमामली केली व जानोजी भोसल्याने तशी बदमामली केली, इत्यादि रडगाणे गात आहे. येथवर पेशव्यांचा सवाल झाला. ह्यापुढे समसामजंगाचे उत्तर आहे.