पान:मराठ्यांच्या इतिहासाची साधनें.pdf/239

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

११४ श्री भवानी प्रसन्न. ३१ मे १७५७. तीर्थस्वरूप राजश्री राजे जीवनराव स्वामी वडिलांचे सेवेसी. कृपा इच्छित कृष्णाजी त्रिंबक स॥ नमस्कार विनंति येथील कुशल ता॥ जेष्ठ शु॥ १३ दर जागा औरंगाबाद जाणून स्वकीय कुशल लेखन करीत असिले पाहिजे. विशेष. वडिलांकडील आशीर्वादपत्रे श्रीमंत सद्गुणमूर्ति माहेबाचे आज्ञापत्रांसहवर्तमान छ १४ साबानचें येक आह्मांकडील अजुरदार कासद जोडीबराबर पाठविलें. दुसरे छ १० माहे मजकूरचें मुजरद हजूरचे कासद जोडीबराबर पाठविले. अशी दोन्ही पत्रे छ १ रमजानी पावली. सविस्तर अर्थ कळों आला. अक्षरशाहा मजकूर नवाब समसामुद्दौला बहाद्दर यांसी पत्रे वाचून दाखवून जेहननसीन केला. सवालजबाबहि परस्परें जाले. ते आलाहिदा मुफसल लिहितों त्याजवरून ध्यानास येणार. बहुत काय लिहूं. कृपा पूर्ण असो द्यावी. हे विनंति. रवाना छ १३ रमजान. [ ६५ ] ॥श्री॥ ३१ मे १७५७. प॥ तीर्थस्वरूप रा॥ राजे जीवनराव वडिलांचे से॥:विनांत श्रीरंगपट्टणची खंडणी जाली; परंतु वसूल न जाला. ठाणी घेतली ते सरकारांत पैका वसूल होवेंतोंवर राहिली ती राखिली पाहिजेत. फौज मातबर पंधरा हजार या प्रांतांत ठेऊन संस्थान मजकूर व चितलदुर्ग वगरे पाळेगारास दबाव रहावा. सिरये प्रांतीं नवाबाचे तेथें दिलावरखान आहेत. गांव खेडी वगैरे चहूंकडे पाळेगारांनी दबविली. दिलावरखां आपले १३८ हा निजामाच्या दरबारी पेशव्यांचा वकील पेशव्यांस त्या दरबारांतील गुप्त बातमी देत असे, हा जीवनराव खासगीवाले असावा.